मार्केटच्या तेजीचा Rakesh Jhunjhunwala यांना फटका; या फेवरेट शेअरच्या विक्रीतून तोटा

शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला बाजाराच्या चालीचा अचूक अंदाज घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 

Updated: Oct 1, 2021, 12:16 PM IST
मार्केटच्या तेजीचा Rakesh Jhunjhunwala यांना फटका; या फेवरेट शेअरच्या विक्रीतून तोटा title=

मुंबई : शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला बाजाराच्या चालीचा अचूक अंदाज घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओवर गुंतवणूकदारांची नेहमीच नजर असते. बरेच गुंतवणूकदार त्याच ट्रेंडच्या आधारे पोर्टफोलिओ तयार करीत असतात. परंतू झुनझुनवाला यांनी ज्या शेअर्सची विक्री केली आहे. त्यांनी सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये शानदार रिटर्न दिले आहेत. तसेच ज्या शेअर्समध्ये त्यांनी नुकतीच खरेदी केली आहे. त्याचे रिटर्न निगेटिव राहिले आहेत. झुनझुनवाला यांनी TITAN, Tata Motors, Aptech, Autoline ndustries आणि VIP Industries चे शेअर विकले होते. या सर्व शेअर्सने मार्च तिमाहीमध्ये चांगले रिटर्न दिले आहे.

TATA Motors
टाटा मोटर्स हा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेला दुसरा मोठा शेअर आहे. जून तिमाहीमध्ये टाटाचे शेअर त्यांनी विकले होते. 0.2 टक्क्यांनी त्यांची हिस्सेदारी कमी केली आहे. गेल्या  महिन्यात या शेअरने 22 टक्के रिटर्न दिला आहे. 

TITAN
टायटन हा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेला सर्वात मोठा शेअर आहे. जून तिमाहीमध्ये त्यांनी त्यांचे शेअर विकले होते. यातील हिस्सेदारी 4.8 टक्क्यांपैकी 0.3 टक्क्यांनी कमी केली होती. या शेअरने  गेल्या 3 महिन्यात 25 टक्के रिटर्न दिला आहे.

Autoline Industries
राकेश झुनझुनवाला यांनी जून तिमाहीमध्ये आपल्या पोर्टफोलिओमधून Autoline Industries चे शेअर कमी केले होते. त्यांनी कंपनीमध्ये आपली 1 टक्के हिस्सेदारी कमी केली होती. आता त्यांचा स्टेक 5.7 टक्क्यांवरून 4.6 टक्के राहिला आहे. गेल्या 3 महिन्यात कंपनीने 29 टक्के रिटर्न दिला आहे.

Aptech 
जून तिमाहीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी Aptech चे शेअर विकले होते. त्यांनी कंपनीमधून 0.04 टक्क्यांनी हिस्सेदारी कमी केली होती. परंतू कंपनीने गेल्या 3 महिन्यात 28 टक्के रिटर्न दिला आहे.

VIP Industries
झुनझुनवाला यांनी या शेअर्सचीदेखील जून तिमाहीत विक्री केली होती. गेल्या 3 महिन्यात शेअर्सने 26 टक्के रिटर्न दिला होता. 

राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही नवीन शेअर सहभागी केले होते. त्यांनी SAIL आणि INDIABULLS HOUSING FINANCE, Edelweiss Financial Services आणि Federal Bank मध्ये गुंतवणूक केली होती. या शेअर्सचा गेल्या 3 महिन्यात निगेटिव रिटर्न आहे.