राकेश झुनझुनवालांनी या कंपनीचे 53 लाख शेअर विकले; 1 वर्षात दिला 88 टक्के रिटर्न

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी रिअल्टी सेक्टरमधील कंपनी टार्कमधील (TARK ltd)मधील हिस्सेदारीत घट केली आहे.  

Updated: Oct 20, 2021, 01:11 PM IST
राकेश झुनझुनवालांनी या कंपनीचे 53 लाख शेअर विकले; 1 वर्षात दिला 88 टक्के रिटर्न title=

मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी रिअल्टी सेक्टरमधील कंपनी टार्कमधील (TARK ltd)मधील हिस्सेदारीत घट केली आहे. झुनझुनवाला यांनी स्टॉकमध्ये डिसेंबर 2020 च्या तिमाहीनंतर पहिल्यांदा 1.8 टक्के हिस्सेदारी  कमी केली आहे. एका वर्षात टार्क लिमिटेडच्या स्टॉक्सने गुंतवणूकदारांना साधारण 88 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 

झुनझुनवाला यांनी TARK मध्ये किती घटवली हिस्सेदारी 
बीएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध टार्क लिमिटेडच्या सप्टेंबर 2021 च्या तिमाहीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिल्यास राकेश झुनझुनवालांनी टार्क कंपनीमध्ये होल्डिंग 3.4 टक्क्यांनी कमी करून 1.6 टक्के केली आहे. 

टार्क लिमिटेडचा 1 वर्षात 88 टक्के रिटर्न
दिग्गज गुंतवणूकदारांनी टार्क लिमिटेडमध्ये हिस्सेदारी कमी केली असली तरी, मागील वर्षभरात स्टॉकने 87.98 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 20 ऑक्टोबरला कंपनीचा भाव प्रति शेअर 41.45 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत होता.

टार्क लिमिटेडमध्ये झुनझुनवाला यांनी डिसेंबर 2020 मध्ये पहिल्यांदाच हिस्सेदारी कमी केली आहे.