Rakesh Jhunjhunwala यांचे 5 मल्टीबॅगर शेअर; एका वर्षात कोट्यावधींचा दिला परतावा

राकेश झुनझुनवाला कोणते शेअर्स खरेदी करत आहेत आणि कोणते शेअर्स विकत आहेत यावर गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात. राकेश झुनझुनवाला हे मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार आहेत, ज्यांना मल्टीबॅगर्स स्टॉक्सची अचुक निवड करता येते. (Rakesh Jhunjhunwala Stocks)

Updated: Dec 9, 2021, 02:00 PM IST
Rakesh Jhunjhunwala यांचे 5 मल्टीबॅगर शेअर; एका वर्षात कोट्यावधींचा दिला परतावा title=

मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओची अनेकदा चर्चा होते. राकेश झुनझुनवाला कोणते शेअर्स विकत घेतात आणि कोणते शेअर्स विकतात यावर लहान-मोठे गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात. खरं तर, राकेश झुनझुनवाला हे मार्केटमधले एक तज्ज्ञ खेळाडू आहेत, जे अशा स्टॉक्सची अचुक निवड करतात, जे भविष्यात मल्टीबॅगर ठरू शकतात. (Rakesh Jhunjhunwala Portfolio Multibagger Stocks)

पोर्टफोलिओमध्ये समावेश केल्यापासून अनेक स्टॉक्सने उत्कृष्ट परतावा दिला आहे. तसे, त्याच्या पोर्टफोलिओमध्ये एकापेक्षा जास्त स्टॉक समाविष्ट आहेत. पण असे 5 स्टॉक्स आहेत, ज्यांनी 1 जानेवारीपासून 85 टक्के ते 310 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

यापैकी 4 शेअर्समध्ये पैसे दुप्पट किंवा तिप्पट झाले आहेत. यामध्ये मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन, अनंत राज लिमिटेड, टाटा मोटर्स, ओरिएंट सिमेंट लिमिटेड आणि टार्क लि चा सामावेश आहे.

हेदेखील वाचा - 7th Pay Commission | केंद्र सरकारचे कर्मचारी मालामाल; नवीन वर्षात सरकार देणार मोठे गिफ्ट

Man Infraconstruction

मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शनचा स्टॉक या वर्षी गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर, या समभागाने गुंतवणूकदारांना 310 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. 1 जानेवारीपासून शेअरचा भाव 23 रुपयांवरून 92 रुपयांपर्यंत वाढला आहे.

राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत सुमारे 1.2 टक्के हिस्सा आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या होल्डिंगमध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. त्यांच्याकडे कंपनीचे 3,000,000 शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य 28 कोटी रुपये आहे.

Anant Raj Ltd

अनंत राज यांचा स्टॉकही गुंतवणूकदारांसाठी या वर्षातील मल्टीबॅगर ठरला आहे. या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर, स्टॉकने गुंतवणूकदारांना 186 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. 1 जानेवारीपासून शेअरचा भाव 27 रुपयांवरून 77 रुपयांपर्यंत वाढला आहे.

राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत सुमारे 3.4 टक्के हिस्सा आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या होल्डिंगमध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. त्यांच्याकडे कंपनीचे 10,000,000 शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य सुमारे 75 कोटी रुपये आहे.

हेदेखील वाचा - 

Tata Motors

वाहन क्षेत्रातील दिग्गज टाटा मोटर्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 165 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. 1 जानेवारीपासून शेअरची किंमत 186 रुपयांवरून 494 रुपयांपर्यंत वाढली आहे.

राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत सुमारे 1.1 टक्के हिस्सा आहे.सप्टेंबर तिमाहीत त्यांनी कंपनीच्या होल्डिंगमध्ये किरकोळ बदल केले आहेत. झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 36,750,000 शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य सुमारे 1805 कोटी रुपये आहे.

Tarc Ltd

Tarc Ltd चा शेअर देखील गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 100 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे.

1 जानेवारीपासून आजपर्यंत शेअरची किंमत 23.5 रुपयांवरून 47 रुपयांपर्यंत वाढली आहे. राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत सुमारे 1.6 टक्के हिस्सा आहे.

हेदेखील वाचा - सावधान! तुमच्या खिशातील ५०० ची नोट खोटी तर नाही ना? खरी नोट ओळखण्यासाठी व्हिडीओ पाहा

Orient Cement Ltd

ओरिएंट सिमेंटचा स्टॉक यंदा गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर, स्टॉकने  गुंतवणूकदारांना 85 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे.

1 जानेवारीपासून शेअरची किंमत 88 रुपयांवरून 162 रुपयांपर्यंत वाढली आहे. राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत सुमारे 1.2 टक्के हिस्सा आहे.

सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या होल्डिंगमध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. त्यांच्याकडे कंपनीचे 2,500,000 शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य सुमारे 40 कोटी रुपये आहे.