ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? त्यातून कोणती माहिती येणार समोर?

 या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स मिळवण्यात यश आलं आहे.

Updated: Dec 9, 2021, 01:35 PM IST
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? त्यातून कोणती माहिती येणार समोर? title=

मुंबई : भारताचे CDS जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचं बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. भारतीय वायुसेनेने सांगितलं की, लष्करी हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. जनरल रावत यांच्या पत्नीही या अपघाताचा बळी ठरल्या. दरम्यान या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स मिळवण्यात यश आलं आहे.

जेव्हा कधी हेलिकॉप्टर किंवा विमान अपघात होतो तेव्हा तपास यंत्रणा त्याचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचा प्रयत्न करतात. अपघाताचं कारण शोधण्यासाठी विमानात ब्लॅक बॉक्स बसवले जातात. विमानाचा ब्लॅक बॉक्स किंवा फ्लाइट डेटा रेकॉर्डर, उड्डाण दरम्यान सर्व विमान-संबंधित माहिती, जसं की विमानाची दिशा, उंची, इंधन, वेग, हालचाल, केबिनचे तापमान इ. डेटाच्या प्रकारांबद्दल 25 तासांपेक्षा जास्त रेकॉर्ड केलेली माहिती संकलित करते.

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

'ब्लॅक बॉक्स' हा प्रत्येक विमानाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. ब्लॅक बॉक्स सर्व विमानांमध्ये असतो मग ते प्रवासी विमान असो, मालवाहू किंवा लढाऊ विमान असो. विमानात उड्डाण करताना विमानाशी संबंधित सर्व प्रकारच्या माहितीची नोंद करण्याचं हे साधन आहे. 

त्याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर देखील म्हणतात. सहसा हा बॉक्स विमानाच्या मागील बाजूस सुरक्षिततेसाठी ठेवला जातो. ब्लॅक बॉक्स हा टायटॅनियमचा बनलेला असतो, जो खूप मजबूत धातू मानला जातो आणि तो टायटॅनियमच्या बनवलेल्या बॉक्समध्ये बंद केला जातो जेणेकरून उंचीवरून जमिनीवर पडल्यास किंवा समुद्राच्या पाण्यात पडल्यास त्याचे किमान नुकसान होऊ शकतं.

ब्लॅक बॉक्सचा इतिहास

ब्लॅक बॉक्सचा इतिहास 50 वर्षांहून अधिक जुना आहे. खरं तर, 1950 च्या दशकात जेव्हा विमान अपघातांची संख्या सातत्याने वाढत होती, तेव्हा 1953-54 च्या सुमारास तज्ज्ञांनी विमानात असं उपकरण बसवण्याविषयी सांगितले जे विमान अपघाताच्या कारणांची योग्य माहिती देऊ शकेल. जेणेकरुन भविष्यात होणारे अपघात टळले जाती.

हे पाहता विमानासाठी ब्लॅक बॉक्स तयार करण्यात आला होता. सुरुवातीला लाल रंगामुळे त्याला 'रेड एग्ज' असं संबोधले जात असे. सुरुवातीच्या काळात पेटीची आतील भिंत काळी ठेवली जात होती, त्यामुळेच कदाचित त्याला ब्लॅक बॉक्स हे नाव पडलं.