Importance of Shaligram stone: अयोध्यानगरीला (ayodhya) हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्वं आहे. अनेकांनाच वंदनीय असणाऱ्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामाचं (Ram) भव्य मंदिर साकारण्यात येत आहे. यासाठीची तयारी अतिशय उत्साहात सुरु असून, सध्या मंदिरात ठेवण्यात येणाऱ्या मूर्तींसाठीचे खडक थेट नेपाळच्या गंडकी नदीतून आणण्यात आले आहेत. तब्बल 127 क्विंटल इतकं वजन असणाऱ्या या शिळा रस्ते मार्गानं भारतात आणल्या जात असून लवकरच त्या अयोध्येपर्यंत पोहोचतील.
अतिशय महतत्वपूर्ण अशा या शिळांची मूर्ती बनवण्यापूर्वी त्यांची विधीवत पूजा केली जाणार आहे. एकिकडे मंदिराच्या तयारीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून, केंद्राकडूनही यात लक्ष घातलं जात आहे. यातच सर्वसामान्यांकडून याबाबत काही प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. प्रभू रामाच्या मूर्तीसाठी शाळीग्रामच का? हा खडक नेपाळमधूनच का आणला जातोय इथपासून असंख्य प्रश्न अनेकांनाच पडल आहेत. चला तर मग जाणून घेऊया या 6 लाख वर्षांपूर्वीच्या शाळीग्राम खडकापर्यंत सर्वकाही. (ram Mandir ayodhya idol will be made with nepals Shaligram stones know the significance and importance)
शास्त्र आणि वेदपुरामणांमध्ये शाळीग्राम खडकाला साक्षात विष्णूचं प्रतीक मानलं जातं. हिंदू धर्मात या खडकाची पूजाही केली जाते. सहसा हा खडक उत्तर नेपाळमधील (nepal) गंडकी नदीमध्ये सापडतो. हिमालयातून येणारं पाणी मोठमोठ्या पर्वतांवर आपटून ते खंडीत होतात आणि त्यातूनच हा खडक तयार होतो. अनेक ठिकाणी मूर्ती बनवण्यासाठी या खडकाचा वापर केला जात. वैज्ञानिक दृष्टीनं पाहायचं झाल्यास हा खडक एक जिवाश्म (Fossil) असून, त्याचे 33 प्रकार आहेत.
भारतामध्ये अनेक ठिकाणी शाळीग्रामापासून मूर्ती साकारतात. असं म्हणतात की कुठंही या खडकाची पूजा केल्यास त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास पाहायला मिळतो. असं सांगण्यात येत आहे, की 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या आधीच प्रभू रामाची शाळीग्रामापासून साकारण्यात आलेली मूर्ती तयार असेल. मुख्य म्हणजे या मूर्ती साकारल्यानंतर त्यामध्ये प्राणप्रतिष्ठापनेचीही आवश्यकता नसते इतकी ताकद या खडकामध्ये असल्याचं सांगण्यात येतं.
सध्याच्या घडीला देशात आलेल्या खडकांचं क्षेत्रफळ 5-6 फूट लांब असून, त्यांची रुंदी 4 फूट असल्याचं कळत आहे. या खडकापासून साकारण्यात आलेल्या मूर्ती अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवली जाणार आहे. याच खडकापासून माता सीतेचीही मूर्ती साकारण्यात येणार आहे.
कोण साकारणार प्रभू रामाची मूर्ती?
विश्वविख्यात शिल्पकार राम वी. सुतार हेच प्रभू रामाची मूर्ती साकारणार आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून, छत्रपती शिवाजी महाराज, शंकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींमुळं त्यांची खास ओळख आहे. महाराष्ट्राशी घट्ट नाळ जोडलेले सुतार एक उत्तम शिल्पकार असून, त्यांना आधुनिक काळातील विश्वकर्मा म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.