चंदीगड : २५ ऑगस्ट रोजी पंचकुला परिसरात जी हिंसा झाली त्यामध्ये मृतांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. याच दिवशी पोलिसांनी बाबा राम रहीमच्या गाड्या जप्त केल्या आणि त्याची कसून तपासणी केली.
या गाड्या आता पंचकुलातील मनसा देवी पोलीस स्टेशनमध्ये उभ्या आहेत. या गाड्यांची जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा लक्षात आलं की या सामान्य गाड्या नसून अगदी लक्झरी कार असून त्या आलिशान ढंगात ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पंचकुलामध्ये झालेल्या हंगामामध्ये सापडलेल्या गाड्यांमधून लक्षात येतं की बाबा रहीमने कशा पद्धतीने धावण्याची तयारी केली होती. पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या फायर ब्रिगेडच्या गाड्यांमध्ये ५/४ चा बॉक्स मिळाला. हा बॉक्स कधीच फायर टेंडरमध्ये नसतो. एवढंच काय तर अनेक सॅनिटरी नॅपकिन्स गुरमीतच्या गाडीतून जप्त करण्यात आले.
याची चौकशी करण्यात आल्यानंतर अशी धक्कादायक माहिती समोर आली की, यामध्ये पेट्रोल भरण्यात आलं होतं. आणि हे पेट्रोल पाण्यात सप्लाय करून त्याद्वारे आग लावण्याची तयारी होती. तसेच गाड्यांमधून काही हत्यारं देखील सापडली. तसेच एक सूटकेस देखील मिळाली ज्यामधून हे निश्चित होतं की गुरमीतचा पळून जाण्याचा प्लान होता.
तसेच कोर्टातून बाहेर आणण्यात आलं तेव्हा गुरमीतच्या गनमॅनने आयपीएस अधिकाऱ्यांशी हातापाई देखील केली. तिथे अधिक जमावाला आणण्याचा मुख्य हेतू हाच होता की, पोलिसांचं संपूर्ण लक्ष त्या जमावाला पांगवण्यात जाईल. आणि तिचं वेळ साधत बाबा राम रहीम पळ काढेल. पण त्याचा हा प्लान यशस्वी झाला नाही.