रांची : कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे लोकांना रुग्णवाहिका उप्लब्ध होत नाहीत. त्यामुळे ग्रस्त झालेल्या रूग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहचायला साधन मिळत नाही. तर कधी रुग्णांना पोहचायला उशीर होतो. ज्यामुळे रुग्णांचा जीव देखील जातो. परंतू अशा परिस्थितीत काही माणसे आपल्याकडून जी काही मदत शक्य होईल ती करत आसतात. अशातच झारखंडच्या रांचीमधून एक बातमी समोर आली आहे.
रांचीमधील एक ऑटो रिक्षाचालक कोरोना रूग्णांसाठी (रुग्णालयात पोहोचण्यासाठी) निस्वार्थ सेवा देत आहे. कोरोना संसर्गामुळे जे लोक त्रस्त आहेत आणि त्यांना रूग्णालयात जावे लागेल, अशा लोकांना तो आपल्या रिक्षाने रुग्णालयात घेऊन जातो. यात खास गोष्ट अशी आहे की, या परिस्थितीत तो विनामूल्य सेवा देत आहे.
ऑटो रिक्षाचालकाचे नाव रवी आहे. त्याचे असे म्हणने आहे की, तो 15 एप्रिलपासून लोकांना मदत करत आहे. जेव्हा कोणत्याही वाहन चालकाने गरजू महिलेला मदत देण्यास नाकारली, तेव्हा तो मदतीसाठी पुढे आला आणि तिला रुग्णालयात नेले. त्याने सांगितले की, त्याचा फोन नंबर सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे, कोणत्याही कोरोना रूग्णाला, रुग्णालयात जाण्याची आवश्यकता आहे आणि कोणीही त्यांना मदत करत नसेल, तर लोकं त्याला संपर्क साधू शकतात. तो त्यांना मदत करेल.
Jharkhand: An auto driver in Ranchi offers free ride to people who need to go to hospitals, amid #COVID19 pandemic. Ravi, the driver says, "Doing this since 15th April when I dopped a woman at RIMS after everyone else refused. My number's on social media so people can contact me" pic.twitter.com/HkL49rzUni
— ANI (@ANI) April 23, 2021
झारखंडमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. संसर्गाच्या बाबतीत, मागील चोवीस तासात आतापर्यंतची सर्वोच्च नोंद झाली आहे. 7 हजार 595 नवीन केसेस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. 106 जणांनी आपला जीव गमावला आहे. रांची जिल्ह्यात एकूण 1 हजार 467 कोरोना प्रकरणे आहेत. वाढत्या संसर्गामुळे सरकारचीही चिंता वाढत आहे.
संसर्ग रोखण्यासाठी सीएम सोरेन यांनी आठवडाभराचा लॉकडाउन लावला आहे. परंतु अद्यापही प्रकरणे कमी होण्याचे नाव घेत नाहीत. 22 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुरु झालेला लॅाकडाऊन 29 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील.