मुंबई : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. कोणतही शासकीय किंवा महत्त्वाचं काम करण्यासाठी आधार कार्डची गरज प्रत्येक भारतीय नागरिकाला भासते. पण तुम्हाला माहिती आहे, ज्या आधार कार्डवर आपली अनेक कामे होतात, ते आधार कार्ड भारतात पहिल्यांदा कोणाला मिळालं. फार कमी लोकांना याबद्दल माहिती असेल. भारतात पहिलं आधार कार्ड मिळवणाऱ्या महिलेचं नाव रंजना सोनावने असं आहे.
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तांभाळी गावात राहणाऱ्या रंजना सोनवणे या बारा वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. आधार क्रमांक मिळविणाऱ्या त्या देशातील पहिली नागरिक ठरल्या. तीन मुलांची आई असलेल्या रंजना सांगतात की 12 अंकी क्रमांकाने त्यांना खूप महत्त्वाच्या गोष्ट दिल्या आहेत.
2010 मध्ये रंजना यांना आधार कार्ड मिळाल्यानंतर त्यांचे पती आणि मुलांचाही आधार क्रमांक मिळाला. रंजना सोनावने आणि त्यांचे पती सदाशिव शेतात काम करतात.
आधार कार्डाची स्थापना केव्हा झाली?
28 जानेवारी 2009 रोजी नियोजन आयोगाने UIDAI ची स्थापना करण्यासाठी अधिसूचना जारी केली. इन्फोसिसचे संस्थापक नंदन नीलेकणी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सप्टेंबर 2010 मध्ये, सरकारने महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात प्रायोगिक तत्त्वावर आधार योजना सुरू केली.
भारतात आधार कार्डची वैधता किती वर्षे आहे?
भारतात, आधार कार्डची वैधता व्यक्ती जिवंत असेपर्यंत आहे. कारण आधार कार्डला ड्रायव्हिंग लायसन्स किंवा एटीएम कार्डसारखी कोणतीही वैधता नसते.