तीन दिवसांनंतर पेट्रोलच्या दराला ब्रेक

सामान्यांच्या खिशाला आराम 

Updated: Dec 2, 2019, 01:33 PM IST
तीन दिवसांनंतर पेट्रोलच्या दराला ब्रेक title=

 नवी दिल्ली : पेट्रोलचे दर सलग तीन दिवस वाढल्यानंतर आज सोमवारी थोडा ब्रेक लागला आहे. चारही महानगरांमध्ये पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीमुळे सामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. 

रविवारी पेट्रोलचे दर दिल्लीत पाच पैसे, कोलकातामध्ये सात पैसे आणि मुंबई, चेन्नईत आठ पैसे प्रती लिटर वाढले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत सात नोव्हेबरनंतर पेट्रोलच्या दरात 2.31 रुपये प्रती लिटर वाढ झाली आहे. सात नोव्हेंबर रोजी दिल्लीत पेट्रोल 72.60 रुपये प्रती लिटर असून गेल्या एका वर्षात पेट्रोलच्या दरात फक्त वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्यावर्षी 24 नोव्हेंबर 2018 रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर 75.25 रुपये प्रती लिटर होता. 

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर क्रमशः 74.91 रुपये, 77.61 रुपये, 80.59 रुपये आणि 77.91 रुपये प्रती लिटर आहे. चारही महानगरांमध्ये डिझेलचया दरात बदल झाले नसून दर क्रमशः 65.78 रुपये, 68.19 रुपये, 69 रुपये आणि 69.53 रुपये प्रती लिटर आहे. 

ऑइल मार्केटिंग कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करतात. कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या दरात पेट्रोलच्या किंमतीसह एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन जोडल्यानंतर याची किंमत जवळपास दुप्पट होते. आपापल्या  शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घरबसल्याही जाणून घेता येऊ शकतात. केवळ एका एसएमएसवर (SMS) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची माहिती मिळू शकते. सकाळी ६ वाजल्यानंतर ९२२४९ ९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवून किंमतींची माहिती मिळू शकते.