'मल्लिका-ए-गझल' बेगम अख्तर यांना गूगलचा सलाम

आपल्या मधूर आवजाने एकापेक्षा एक दर्जेदार गाणी गात रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका बेगम अख्तर यांची आज जयंती. इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्ज इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गूगलनेही खास डूडल बनवत अख्तर यांचे अनोखे स्मरण केले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 7, 2017, 09:59 AM IST
'मल्लिका-ए-गझल' बेगम अख्तर यांना गूगलचा सलाम title=
छायाचित्र : सौजन्य - गुगल

मुंबई : आपल्या मधूर आवजाने एकापेक्षा एक दर्जेदार गाणी गात रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका बेगम अख्तर यांची आज जयंती. इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्ज इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गूगलनेही खास डूडल बनवत अख्तर यांचे अनोखे स्मरण केले आहे.

बेगम अख्तर यांची अगदी अलिकडची ओळख सांगायची तर, तुम्हाला विशाल भारद्वाजच्या फिल्म डेढ इश्किया मधलं ‘हमरी अटरिया पे आजा ओ संवरिया… देखा-देखी तनिक होई जाए‘, हे गाणं तर तुम्ही ऐकलं असेलच. आपल्यापैकी अनेकांना या गाण्याने वेड लावलं. पण, तुम्हाला माहिती आहे का, ठुमरी प्रकारातील या गाण्याची मूळ गायिका आहेत बेगम अख्तर. या सुप्रसिद्ध गायिकेची आज (शनिवार, ७ ऑक्टोबर) १०३वी जयंती. बेगम अख्तर यांच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत. पण, इंटरनेट क्षेत्रातील सर्वात मोठे सर्च इंजिन अशी ओळख असलेले गूगलही बेगम अख्तर यांच्या खास प्रेमात आहे.

गूगलने आजचे डूडल बेगम अख्तर यांना अर्पण केले आहे. बेगम अख्तर यांची प्रतिमा आणि सोबत अनेक वाद्ये अशी सामग्री वापरलेली प्रतिमा डूडलला अधिक लक्षवेधी बनवातना दिसते. अख्तर गायन करतायत आणि श्रोते पुढे बसून त्यांच्या गायनाचा आनंद घेत आहेत, अशी मैफिलीची अनुभूती येईल असे डूडल बेगम अख्तर यांच्या चाहत्यांसाठी खास भेट असेल हे नक्की.

जीवन परिचय

बेगम अख्तर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद इथला. ७ ऑक्टोबर १९१४ या दिवशी जन्मलेल्या बेगम अख्तर यांना लहानपनापासूनच गायन आणि संगिताची विशेष आवड. एक उत्कृष्ट पार्श्वगायिका व्हायचे हा ध्यास त्यांना बालपनापासूनच होता. पण, सर्वसामान्य कुटूंबात असतो त्याप्रमाणे अख्तर यांच्या कुटूंबातूनही त्यांच्या या आवडीला विरोधच होता. पण, असे असले तरी, अख्तर यांचा स्वत:वर विश्वास होता. तसेच, त्यांच्यातील टॅलेंट त्यांना स्वस्त बसू देत नव्हते. त्यांना संगित नाटकातून पहिली संधी मिळाली.  गायनाला सुरूवात करताना त्यांनी कोलकातातील ईस्ट इंडिया नाटक कंपनीत अभिनय करण्याचीही संधी मिळाली. ‘एक दिन का बादशाह’ नावाच्या चित्रपटातून अख्तर यांनी आपल्या सीने कारकीर्दिला सुरूवात केली. अर्थात पहिलाच चित्रपट दणकून आपटला. त्यामुळे अख्तर यांना विशेष ओळख मिळू शकली नाही. कालांतराने त्या मुंबईत आल्या आणि त्यांची गायकी बहरत गेली. 

पुरस्कार

३० ऑक्टोबर १९७४मध्ये बेगम अख्तर यांनी जगाला अलविदा केले. भारतातील लोकप्रीय ठुमरी गायिका म्हणून आजही त्यांचे नाव आदराने घेतले आहे. भारत सरकारने त्यांना १९६८ मध्ये पद्मश्री आणि सन १९७५मध्ये पद्म भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. अख्तर यांना मल्लिका-ए-ग़ज़ल म्हणूनही ओळखले जाते.