REPUBLIC DAY 2022 : मोनिकाSSSSS ओ माय डार्लिंग....; भारतीय नौदलाचा तडकता भडकता सराव

ही रंगीत तालीम साऱ्या देशाचं लक्ष वेधत आहे.   

Updated: Jan 20, 2022, 11:32 AM IST
REPUBLIC DAY 2022 : मोनिकाSSSSS ओ माय डार्लिंग....; भारतीय नौदलाचा तडकता भडकता सराव title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : Republic Day Rehearsals प्रजासत्ताक दिन जवळ आला की सर्वांनाच वेध लागतात थेट दिल्लीचे. राजपथावर होणाऱ्या भारतीय संरक्षण दलाच्या पथसंचलनाचे. शिस्त, देशप्रेम याचीच झलक या पथसंचलनातून पाहायला मिळते. यंदाच्या वर्षीही याचीच तयारी सध्या सुरु असल्याचं कळत आहे. सरावाला वेग आला आहे आणि ही रंगीत तालीम साऱ्या देशाचं लक्ष वेधत आहे. 

यंदाच्या वर्षी पथसंचलनामध्ये भारतीय वारसा आणि आत्मनिर्भरता यांचं दर्शन घडणार आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम यंदा एक दिवस आधी, म्हणजेच 23 तारखेपासून सुरु होणार आहे. पुढे 30 जानेवारी म्हणजेच साधारण आठवडाभर हे कार्यक्रम सुरु असणार आहेत. 

कार्यक्रमाच्या रुपरेषेतही काही बदल करण्यात आले आहेत. ज्या अनुशंगाने भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल तयारीलाही लागलं आहे. 

सोशल मीडियावर सध्या या तिन्ही दलांच्या सरावादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियार पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये तर चक्क भारतीय नौदलाचे जवान कडाक्याच्या थंडीतही पथसंचलनाचा सराव करताना दिसत आहेत. 

बरं, इथं आस्ते कदम, सीधे चलेंगे... अशा कमांडवर न चालता ही मंडळी चक्क बॉलिवूड गीतांवर थिरकताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arun Sharma (@arunsharmaht)

रुबाबदार पेहराव, हातात बंदुका, तोंडावर मास्क आणि 'मोनिकाssss ओ माय डार्लिंग'ची आरोळी, असं या जवानांचं रुप पाहायला मिळत आहे. 

नौदलाचा बँड हे गाणं अतिशय कमाल अंदाजात वाजवत असून त्यावर हे जवान ज्या पद्धतीनं एकरुप होऊन ठेका धरत आहेत हे पाहताना नकळतच आपणही त्यांना दाद देऊन जात आहोत.