close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना पंतप्रधान मोदींकडून आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खय्याम यांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिलीय

Updated: Aug 20, 2019, 09:34 AM IST
ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना पंतप्रधान मोदींकडून आदरांजली

नवी दिल्ली : ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन झालंय. सोमवारी रात्री उशिरा वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खय्याम यांचं पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाशमी असं होतं. उमराव जाव, बाजार, खानदान, कभी कभी, नूरी अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. हे सिनेमे खय्याम यांच्या संगितामुळेच आजही चर्चेत असतात. 'उमराव जान'साठी त्यांना राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार तसंच फिल्म फेअर अवॉर्डही मिळाला होता. २०११ मध्ये खय्याम यांना भारत सरकारनं तिसऱ्या सर्वोच्च सन्मान असणाऱ्या 'पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खय्याम यांना ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिलीय. 'सुप्रसिद्ध संगीतकार खय्याम साहेब यांचं निधनामुळे अत्यंत दुख; झालं. त्यांच्या योगदानाबद्दल चित्रपटसृष्टी आणि कलाविश्व त्यांचं सदैवं ऋणी राहील. या दुख;द क्षणी माझ्या संवेदना त्यांच्या चाहत्यांच्या पाठिशी आहेत' असं ट्विट पंतप्रधानांनी केलं आहे.  

खय्याम यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी अविभाजित पंजाबच्या नवांशहर जिल्ह्यातील राहोनमध्ये झालं होतं. संगीतासाठी ते घरातून पळून दिल्लीला दाखल झाले होते. परंतु, कुटुंबीयांनी त्यांना शोधून काढून शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत आपल्यासोबत घेऊन गेले. परंतु, पुन्हा एकदा खय्याम संगीत शिकण्यासाठी लाहौरला निघून गेले. इथं त्यांनी बाबा चिश्ती यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. त्यानंतर ते दिल्लीत आले आणि इथं ते पंडित अमरनाथ यांचे शागिर्द बनले. दुसऱ्या महायुद्धानंतर ते मुंबईत दाखल झाले.

त्यांच्या पत्नीचं नाव जगजीत कौर असं होतं. जगजीत कौर यादेखील गायिका होत्या. त्यांनी उमराव जान आणि शगुन यांसारख्या सिनेमांतील गाणी गायली. २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं होतं.