विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं - तेजस्वी यादव

एनडीए आणि महाआघाडी यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.    

Updated: Nov 10, 2020, 10:37 PM IST
विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं - तेजस्वी यादव title=

बिहार निकाल : एनडीए आणि महाआघाडी यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे. त्यामुळे  सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. तसंच करोना प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशात तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडून मतमोजणीत गोंधळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं असं आरजेडीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रीय जनता दलानं आपल्या उमेदवारांची एक यादी ट्विटरवर प्रसिद्ध करत आरोप केले आहेत. 'संबंधित यादी ही त्या ११९ उमेदवारांची आहे, ज्याठिकाणी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत. रिटर्निंग अधिकाऱ्यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या असल्यांचं या ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही त्यांना विजयी घेषित करण्यात आलं.  तरी देखील ते सर्टिफिकेट न देता पराभूत झाल्याचं उमेदवारांना सांगत आहेत. लोकशाही मध्ये अशी लूट चालणार नाही असं देखील आरजेडीनं ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, कोरोना व्हायरसचे पडसाद बिहार निवडणुकीच्या मतमोजणीवर पडताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगानं जारी केलेल्या  मार्गदर्शक सूचनांनुसार बिहारमध्ये निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे. त्यामुळे मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.