Russia च्या परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण सुरु होताच अनेक देशांनी रशियाला अशी दिली चपराक

रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात आता अनेक देश उघडपणे विरोध करु लागले आहेत. UN च्या सभे देखील असंच चित्र पाहायला मिळालं.

Updated: Mar 1, 2022, 10:37 PM IST
Russia च्या परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण सुरु होताच अनेक देशांनी रशियाला अशी दिली चपराक title=

नवी दिल्ली : युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला आता जगभरातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. रशियाला एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांचे संबोधन सुरु होताच अनेक देशाचे प्रतिनिधी उठून निघून गेले. ( mass diplomatic boycott at un rights council against Russia)

लावरोव यांचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ जेव्हा सुरु करण्यात आला. तेव्हा रशियाचा निषेध म्हणून अनेक सदस्यांनी ही गोष्ट केली. अनेक देशांनी आता रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केलाय. वॉकआउटचे नेतृत्व करणारे युक्रेनचे राजदूत येव्हानिया फिलिपेन्को म्हणाले, "युक्रेनियन लोकांना तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत." त्यांच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही हा पाठिंबा दिला आहे.

फ्रान्सचे राजदूत जेरोम बेनाफॉंट म्हणाले की, कोणताही हल्ला हा मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होत असून मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. मानवाधिकार परिषद युक्रेन आणि तेथील लोकांसोबत असल्याचे या वॉकआऊटवरून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. 

त्याआधी निशस्त्रीकरणावरील परिषदेत लावरोव्ह यांचे भाषण प्रसारित होणार होते, त्यावरही युरोपीय देशांनी बहिष्कार टाकला होता. अनेक देशांचे मुत्सद्दी चेंबरच्या बाहेर जमले होते आणि तेथे युक्रेनचा ध्वज फडकत होता. येथे त्यांनी युक्रेनची जोरदार प्रशंसा केली आणि रशियाची निंदा केली.

या बहिष्काराच्या वेळीही येमेन, सीरिया, व्हेनेझुएला आणि ट्युनिशियाच्या सदस्यांनी रशियन परराष्ट्रमंत्र्यांचे संबोधन ऐकले. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री मंगळवारी जिनिव्हा येथे येणार होते. मात्र युरोपीय देशांनी घातलेल्या बंदीचा हवाला देत त्यांनी आपला दौरा रद्द केला. 

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आज रशियावर जोरदार टीका केली. मंगळवारी त्यांनी एक व्हिडिओ मेसेज जारी करून रशियाने नागरिकांची हत्या केल्याचा आरोप केला. जे कोणीच विसरु शकणार नाही असं म्हटलं.