Sarkari Naukri 2021: बँक नोट प्रेसमध्ये वेग-वेगळ्या पदांसाठी भरती

नोकरीकरीता अर्ज भरण्यासाठी bnpdewas.spmcil.com या संकेत स्थळाला भेट द्या.  

Updated: May 9, 2021, 09:32 PM IST
Sarkari Naukri 2021: बँक नोट प्रेसमध्ये वेग-वेगळ्या पदांसाठी भरती

मुंबई :  बँक नोट प्रेसमध्ये वेग-वेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया  सुरू आहे. त्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहेत. नोटिफिकेशननुसार एकून 135 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी हवी असले तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी बँक प्रेस नोट देवासच्या ऑफिशियल वेबसाइट- bnpdewas.spmcil.com वर अर्ज दाखल करू शकता. बीएनपीकडून जारी नोटिफिकेशनमध्ये सांगितल्यानुसार अर्ज दाखल 12 मे 2021 करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

नोटिफिकेशन कनिष्ठ अधिकारी आणि सुपरव्हायजर विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. सर्व उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. उमेदवार त्यांचे अर्ज 11 जूनपर्यंत भरू शकतात. नोकरीकरीता अर्ज भरण्यासाठी bnpdewas.spmcil.com या संकेत स्थळाला भेट द्या.

या पदांसाठी भरती
वेलफेयर प्रेस- 01

सुपरवाइजर- 02

जूनियर ऑफिस असिस्टेंट- 15

जूनियर टेक्नीशियन- 113

सेक्रेटियल असिस्‍टेंट- 01

जूनियर ऑफिस असिस्टेंट- 03
 
अधिक पदांसाठी उमेदवार पदवीधर असणं अत्यंत गरजेचं आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयाचे कागदपत्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्ष ते 28 वर्षांपर्यंत असणं बंधनकारक आहे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना नियमांनुसार सुट मिळेल.