मुंबई : देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममध्ये रोख रक्कम काढण्याची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर 31 ऑक्टोबरपासून एका दिवसाला तुम्ही फक्त 20 हजार रुपयेच काढू शकणार आहात. एटीएममधून याआधी दिवसाला 40 हजार रुपये काढण्याची मर्यादा होती.
एसबीआयने याबबात सर्वच शाखांना आदेश दिले आहेत. एटीएमच्या माध्यमातून लोकांचे पैसे लुटण्याचे प्रकार वाढल्याने स्टेट बँक ऑफ इंडियांने हा निर्णय घेतला आहे. डिजिटल व्यवहारांचा चालना देण्यासाठी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे बँकांमध्ये गर्दी वाढण्याची देखील शक्यता आहे. मोठे व्यवहार करण्यासाठी आता तुम्हाला डिजीटल किंवा बँकेत जावून पैसे काढावे लागणार आहेत.
मागच्या वर्षभरात एटीएमच्या माध्य़मातून लोकांना फसल्याच्या आणि लुटल्य़ाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बँकेने हे पाऊल उचललं आहे.