मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रीय बँक आहे, जी रुपे डेबिट कार्ड वापरणाऱ्या सर्व जन-धन खातेधारकांना 2 लाख रुपयांपर्यंतचे विनामूल्य अपघाती संरक्षण प्रदान करत आहे. एसबीआय त्यांच्या ग्राहकांचे जन धन खाते उघडण्याच्या कालावधीनुसार त्यांच्या विम्याची रक्कम ठरवेल. ज्या ग्राहकांचे प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) खाते 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडण्यात आले आहे, त्यांना जारी केलेल्या RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळेल. तर 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी केलेल्या RuPay कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती कव्हर बेनिफिट उपलब्ध असेल.
प्रधानमंत्री जन धन योजना ही एक अशी योजना आहे, ज्या अंतर्गत देशातील गरीबांचे खाते बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शून्य शिल्लक वर उघडले जाते. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात.
या योजनेमध्ये, कोणतीही व्यक्ती जन धन खाते ऑनलाईन उघडू शकते किंवा केवायसी कागदपत्रे सबमिट करून शकतात. एवढेच नाही तर कोणीही त्यांचे बचत बँक खाते जन धन मध्ये रूपांतरित करू शकते. यामध्ये बँकेकडून रुपेकार्ड दिले जाते. हे डेबिट कार्ड अपघाती मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कव्हर आणि इतर अनेक फायद्यांसाठी वापरले जाऊ शकते
जन धन खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड अंतर्गत अपघाती मृत्यू विम्याचा लाभ मिळेल, जेव्हा विमाधारकाने अपघाताच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत कोणत्याही इंट्रा किंवा इंटर बँक चॅनेलवर यशस्वी आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार केले. अशा परिस्थितीत फक्त ही रक्कम दिली जाईल.
क्लेम मिळवण्यासाठी तुम्हाला आधी क्लेम फॉर्म भरावा लागेल. यासोबत मूळ मृत्यू प्रमाणपत्र किंवा प्रमाणित प्रत जोडावे लागतील. त्याला एफआयआरची मूळ किंवा प्रमाणित प्रत जोडा. पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आणि एफएसएल रिपोर्ट देखील त्यासोबत असावा. आधार कार्डाची प्रत कार्डधारकाकडे रुपे कार्ड असल्याचे प्रतिज्ञापत्र बँक स्टॅम्प पेपरवर द्यावे लागेल. सर्व कागदपत्रे 90 दिवसांच्या आत सादर करायची आहेत. पासबुकच्या प्रतीसह नॉमीनेशन व्यक्तीचे नाव आणि बँक तपशील सादर करावे लागतील.
1. विमा दावा फॉर्म
2. मृत्यू प्रमाणपत्राची प्रत
3. कार्डधारक आणि नॉमीनेशन व्यक्तीचा आधार प्रत
4. इतर कारणांमुळे मृत्यू झाल्यास रासायनिक विश्लेषण किंवा एफएसएल अहवालासह पोस्ट मॉर्टम अहवालाची प्रत
5. अपघाताचा तपशील देणाऱ्या एफआयआर किंवा पोलिस अहवालाची मूळ किंवा प्रमाणित प्रत
6. कार्ड जारी करणाऱ्या बँकेच्या वतीने अधिकृत स्वाक्षरी आणि बँक शिक्काद्वारे विधिवत स्वाक्षरी केलेले घोषणापत्र
7. यामध्ये बँक अधिकाऱ्याचे नाव आणि ईमेल आयडीसह संपर्क तपशील द्यावा