SBI Special Offer : 14 सप्टेंबरपर्यंत करा SBIमध्ये स्पेशल डिपॉजिट आणि मिळवा जास्त व्याजासह अनेक फायदे

जर तुम्हाला देखील कमी पैशात मोठा नफा कमवायचा असेल , तर तुम्ही एसबीआयच्या या योजनेत पैसे गुंतवू शकता.

Updated: Sep 8, 2021, 02:13 PM IST
SBI Special Offer : 14 सप्टेंबरपर्यंत करा SBIमध्ये स्पेशल डिपॉजिट आणि मिळवा जास्त व्याजासह अनेक फायदे

मुंबई : भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक योजना बाजारात आणली आहे. वास्तविक, बँकेने विशेष ठेव योजना सुरू केली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट्स ही एक विशेष ठेव योजना बँकेकडून सुरू करण्यात आली आहे. जी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.

जर तुम्हाला देखील कमी पैशात मोठा नफा कमवायचा असेल आणि तुम्हाला रिस्क देखील घ्यायची नसेल तर तुम्ही एसबीआयच्या या योजनेत पैसे गुंतवू शकता. एसबीआयने ट्विट करून ग्राहकांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

बँकेकडून मिळाली ही माहिती

एसबीआयने म्हटले आहे की, भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष प्लॅटिनम ठेवींसह साजरे करण्याची वेळ आली आहे. एसबीआयसह मुदत ठेवी आणि विशेष मुदत ठेवींचा लाभ घ्या. ही विशेष ऑफर 14 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध आहे.

विशेष ठेवी योजनेची वैशिष्ट्ये

1. या योजने अंतर्गत, ग्राहक 75 दिवस, 525 दिवस आणि 2250 दिवसांसाठी निश्चितकाळासाठी पैसे मिळवू शकतो.
2. तसेच, NRE आणि NRO मुदत ठेवींसह घरगुती किरकोळ मुदत ठेवी (2 कोटी रुपयांपेक्षा कमी) या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
3. या अंतर्गत, नवीन आणि रिन्यूअल डिपोजीत देखील ठेवले जाऊ शकते.
4. तसेच फक्त मुदत ठेव आणि विशेष मुदत ठेव उत्पादन आहे.
5. NRE डिपॉजिट्स फक्त 525 आणि 2250 दिवसांसाठी आहेत.