नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी चांगली स्कीम ऑफर करीत आहे. ज्यामध्ये फिक्स डिपॉजिट (FD)ची रक्कम गरज पडल्यास ATM मधून काढली जाऊ शकते. SBI ची ही मल्टी ऑप्शन डिपॉजिट स्कीम आहे. FD ची सर्वात मोठी अडचण म्हणजेच गरज पडल्यास FD तोडण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु SBI MODS अकाउंटमध्ये ही सुविधा मिळते की ग्राहक याला सेविंग अकाउंटमधून करंट अकॉऊंटसारखे पैसे काढू शकता.
काय आहे SBI MODS स्कीम
एसबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, एसबीआयची मल्टी ऑप्शन डिपॉजिट स्कीम एक टर्म डिपॉजिट म्हणजेच FD असते. यात डिपॉजिटर सेविंग अकॉउंट किंवा करंट अकॉउंटशी लिंक्ड असतो. म्हणजेच गरज पडल्यास तुम्ही 1000 च्या पटीत पैसे सेविंग किंवा करंट अकाउंटमधून काढू शकता. तुम्ही हे पैसे ATM मधून देखील काढू शकता. MODS वर तेवढेच व्याज मिळते जेवढे व्याज सामान्य एफडी खात्यावर मिळते.
SBI MODS किती रुपयांमध्ये अकाउंट सुरू करता येते?
एसबीआय वेबसाईटच्या मते, SBI MODS अकाउंटसाठी कमीत कमी डिपॉजिट 10 हजार रुपये आहे. 1000च्या पटीत रक्कम डिपॉजिट केली जाऊ शकते. यामध्ये कमाल डिपॉजिटची कोणतही मर्यादा नाही. SBI MOD चे अकाउंट कमीत कमी 1 वर्ष आणि कमाल 5 वर्षापर्यंत उघडता येते.
SBI MODS कर्जाची सुविधा
SBI MODS अकाउंटवर कर्ज सुद्धा घेता येते. त्याशिवाय नॉमिनीची सुद्धा सुविदा आहे. हे अकाउंट एसबीआयच्या अन्य ब्रॅंचमध्येदेखील ट्रान्सफर करता येते.