गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी 'एसबीआय'ची खुशखबर

नवं घर घेणाऱ्या ग्राहकांनाही या बदललेल्या व्याजदरांचा फायदा मिळणार आहे

Updated: Dec 31, 2019, 06:10 PM IST
गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी 'एसबीआय'ची खुशखबर

मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया'नं ग्राहकांना मोठी खुशखबरी दिलीय. एसबीआयनं आपलं गृहकर्ज आणखीन स्वस्त केलंय. बँकेनं सोमवारी एक्स्टर्नल बेन्चमार्क रेट (EBR) मध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केलीय. यामुळे ८.०५ टक्क्यांहून घट होत आता व्याजदर ७.८० टक्क्यांवर आलाय. डिसेंबरमध्ये आरबीआयद्वारे मौद्रिक नीती जाहीर करण्यात आल्यानंतर एक्स्टर्नल बेन्चिमार्क रेटमध्ये कपात करणारी एसबीआय ही पहिली बँक ठरलीय. 

नवीन व्याजदर १ जानेवारी २०२० पासून लागू होतील. त्यामुळे नवं घर घेणाऱ्या ग्राहकांच्या गृहकर्जाची सुरुवात ७.९ टक्क्यांनी होईल. हाच दर अगोदर ८.१५ टक्के आहे. उल्लेखनीय म्हणजे, यंदाच्या वर्षात एसबीआयनं MCLR मध्ये तब्बल ०.६५ टक्क्यांची कपात केलीय.

एक्स्टर्नल बेन्चमार्क रेट

रिझर्व्ह बँकेनं गृहकर्जावर व्याजदर निश्चित करण्यासाठी बँकांना एप्रिल २०१९ पासून एक्स्टर्नल बेन्चमार्कचा (ट्रेझरी बिल रेटस किंवा रेपो रेटस्) वापर करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी बँक गृहकर्जावर व्याजदर निश्चित करण्यासाठी इंटरनल बेन्चमार्कचा (मार्जिनल कॉस्ट ऑफ रेजिंग फंडस्) वापर करत होत्या.