पाकिस्तानातून (Pakistan) आपला प्रियकर सचिनसाठी भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) अद्यापही चर्चेत आहे. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे असणाऱ्या त्यांच्या या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा सुरु आहे. सचिनसाठी (Sachin) सीमाने आपल्या चार मुलांसह सीमा ओलांडली असून नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आहे. दरम्यान, अनधिकृतपणे भारतात दाखल झाल्याने आणि तिला आश्रय दिल्याने सचिन आणि सीमा या दोघांचीही उत्तर प्रदेश एटीएसकडून चौकशी सुरु आहे. दोघांच्या मागे सध्या चौकशीचे ससेमिरा लागला असताना, दुसरीकडे त्यांना नशिबाचीही साथ लाभताना दिसत आहे. याचं कारण सीमा हैदर लवकरच बॉलिवूड चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.
भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरला यापुढे बॉलिवूड अभिनेत्री अशी ओळख मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण एका प्रोडक्शन हाऊसने नुकतीच सीमा हैदरची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी तिचं ऑडिशनही घेतलं.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे जानी फारयफॉक्सच्या टीमने बुधवारी सीमाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आगामी चित्रपट 'अ टेलर मर्डर स्टोरी' चित्रपटासाठी तिचं ऑडिशन घेतलं. या चित्रपटात सीमा रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट राजस्थानच्या उदयपूर येथील कन्हैयालाल या टेलरच्या हत्येवर आधारित असणार आहे. कन्हैय्यालाल यांची त्यांच्याच दुकानात अतिरेक्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती.
दरम्यान यावेळी हिंदू धर्म स्वीकारल्याबद्दल सीमाचा चित्रपट निर्माते अमी जानी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. सीमाने यावेळी भगवी शाल अंगावर घेतली होती. सत्कारावेळी तिने चित्रपट निर्मात्याच्या पाया पडत आशीर्वाद घेतले.
JANi FIREFOX प्रोडक्शन हाउस की टीम सीमा हैदर से मिली।फ़िल्म डायरेक्ट जयंत सिन्हा और भारत सिंह ने लिया सीमा का ऑडिशन।A Tailor Murder Story मे RAW एजेंट का किरदार निभाएगी सीमा।उदयपुर मे कन्हैया लाल की हत्या पर बन रही है फ़िल्म।सीमा को ATS की रिपोर्ट का इंतज़ार।@indiatvnews pic.twitter.com/05a5GZs1rb
— Atul Bhatia (@Atul_Bhatia80) August 2, 2023
पण सीमा हैदरने चित्रपटात काम करण्यात तपासाचा अडथळा आहे. सीमाने अनधिकृतपणे भारतात प्रवेश केला असून, तसंच तिचे पाकिस्तानमधील नातलग आणि इतर गोष्टी पाहता उत्तर प्रदेश एटीएसकडून चौकशी सुरु आहे. सीमा हैदर खरंच प्रेमापोटी भारतात आली आहे की, यामागे अन्य काही कारण आहे याचा तपास केला जात आहे. दरम्यान, चित्रपटात काम करण्याआधी सीमा हैदर आणि प्रोडक्शन हाऊस एटीएसच्या अहवालाी वाट पाहत आहेत.
पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची येथून सीमा हैदर आपल्या चार मुलांसह भारतात आली होती. सचिनसोबत नेपाळमध्ये लग्न केल्यानंतर दोघे ग्रेटर नोएडामधील राबपुरा गावात राहायला गेले. PUBG खेळताना दोघे ऑनलाइन भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले असा त्यांचा दावा आहे. दोघांची लव्हस्टोरी समोर आल्यानंतर चांगलीच व्हायरल झाली होती. पण आता या लव्हस्टोरीला वेगवेगळे रंग मिळत असून, तपासाअंती सत्य समोर येईल.