High Return Stocks: 42 रुपयांच्या शेअरने 1 लाखाचे केले 19.5 लाख, 5 वर्षांत 1850 टक्के रिटर्न

1 लाखाचे केले 19.5 लाख, तर 5 लाखांचे किती...  काय आहे कंपनीचे नाव?   

Updated: Sep 7, 2021, 12:17 PM IST
High Return Stocks: 42 रुपयांच्या शेअरने 1 लाखाचे केले 19.5 लाख, 5 वर्षांत 1850 टक्के रिटर्न title=

मुंबई : शेअर मार्केटमध्ये आज अनेक लोक गुंतवणूक करण्यास प्रधान्य देतात. पण कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास नफा होवू शकतो हे तज्ज्ञाकडून माहिती केल्यावरचं योग्य कंपनीच्या शेअरमध्ये पैसे गुंतवा. आता एका कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना 5 वर्षांत 1 हजार 850 टक्के रिटर्न दिलं आहे. या कंपनीचं नाव आहे Raghav Productivity Enhancers. ही एक मायक्रोकॅप  कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरचे दर आज 788 रूपये आहे. त्यामुळे जर पाच वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणुकदारांना मोठा नफा झाला आहे. 

गेल्या 5 वर्षांपूर्वी म्हणजे 23 सप्टेंबर 2016 साली कंपनीच्या शेअरची किंमत 42.5 रूपये इतकी होती.  आज हे शेअर्स 820 रूपये प्रती शेअर आहे. म्हणजे 5 वर्षांमध्ये या शेअर्सने त्यांच्या गुंतवणुकदारांना 1 हजार 850 टक्के रिटर्न दिले आहेत. तर एका वर्षात शेअरने 652 टक्के रिटर्न दिले आहेत. एका महिन्यात काही प्रमाणात घसरण दिसून आली.

Raghav Productivity Enhancers कंपनीच्या शेअरमध्ये ज्यांनी 5 वर्षांपूर्वी 1 लाख रूपये गुंतवले होते त्यांना 19.52 रूपये रिटर्न मिळाले आहेत. तर ज्यांनी 5 लाख रूपये गुंतवले आहे त्यांनी तब्बल 97 लाख 61 हजार रूपयांचा फायदा झाला आहे. सेन्सेक्सशी तुलना केल्यास सेन्सेक्सने या पाच वर्षांत 101 टक्के रिटर्न दिलं आहे.

 Raghav Productivity Enhancers कंपनीच्या शेअर्सची कामगिरी त्याच्या आर्थिक स्थितीनुसार आहे. जयपूरस्थित ही कंपनी मोठ्या प्रमाणावर खनिजांचे उत्पादन करते आणि दगड पुरवठादार म्हणून काम करते. कंपनी फेरो एलॉय, रॅमिंग मास, सिलिका रॅमिंग मिक्स आणि पिग आयरनची निर्मिती आणि निर्यात करते.