जत्रेत पाळणा तुटल्याने मोठी दुर्घटना... मुलांना पाळण्यात बसवताय तर सावधान! पाहा धक्कादायक Video

जत्रेत पाळणा तुटला आणि एकच गोंधळ उडाला... Video पाहून उडेल अंगाचा थरकाप

Updated: Oct 1, 2022, 05:39 PM IST
जत्रेत पाळणा तुटल्याने मोठी दुर्घटना... मुलांना पाळण्यात बसवताय तर सावधान! पाहा धक्कादायक Video title=

Trending News : तुम्ही जत्रेत मुलांना पाळण्यात बसवत असाल तर सावध व्हा. उत्तर प्रदेशातील (UttarPradesh) गाझियाबादमध्ये (Ghaziabad) जत्रेतला (The Fair) पाळणा तुटल्याने तीन मुलं आणि एक महिला गंभीर जखमी झाले आहेत.  या घटनेने जत्रेत एकच गोंधळ उडाला. जखमींना एमएमजी रुग्णालयात (MMG Hospital) दाखल करण्यात आलं आहे. जखमी महिलेने दिलेल्या माहितीनुसार तो पाळणा आधीपासूनच कलला होता. याबाबत आम्ही पाळणा चालवणाऱ्याला माहिती दिली होती, पण त्याने याकडे लक्ष दिलं नाही.

गाझियाबादमधल्या घंटाघर मैदानात रामलीलाचा (Ramlila Ground) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने जत्राही भरवली जाते. या जत्रेत वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे असतात. यापैकीच एक असलेल्या ब्रेक डान्स पाळण्यात अनेकजण बसले होते. वेगाने गोल गोल फिरणारा हा पाळणा असतो. यावेळी ब्रेक डान्स पाळणा तुटला आणि वेगाने बाजूला फेकला गेला.

हा अपघात इतका भयंकर होता पाळणा तुटून वेगाने दूरवर फेकला गेला. तर पाळण्यातील तीन मुलं आणि एक महिलाही दूरवर फेकली गेली. या दुर्घटनेत हे चौघंही जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर रामलीला मैदानावर एकच गोंधळ उडाला. पाळणा तात्काळ थांबवण्यात आल्या, पाळण्यात बसलेल्या मुलांना त्यांचे पालक घेऊन पळू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

दुर्घटनेतील जखमींना गाझियाबादमधल्या एमएमजी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार जखमींना सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. उपचारानंतर त्यांना रुग्णालयतून सोडण्यात आलं. 

याआधी मोहालीमधल्या दसरा मैदानात 50 फूट उंच ड्रॉप टॉवर राईड तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. काही कळण्याच्या आतच ही घटना घडली. त्यानंतर मोहालीत भरलेल्या जत्रेत मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी या राईडवर 30 जण होते. त्यातील सर्वच जण जखमी झालेत. 13 जण गंभीर झाले होते. त्यामुळे तुम्ही जत्रेत पाळण्यात बसताना सावधगिरी बाळगा.