हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खणं तर सोडाच, पण त्याचं नाव देखील घेणार नाही...

सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे की, जेथे दिवसेंदिवस काही ना काही व्हिडीओ पोस्ट होत असतात.

Updated: Aug 22, 2021, 03:13 PM IST
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खणं तर सोडाच, पण त्याचं नाव देखील घेणार नाही... title=

मुंबई : पाणीपुरीं प्रेमींची आपल्या देशात कमी नाही. दर दहा व्यक्तींमधील 8 व्यक्तींना पाणीपुरी आवडतेच. तसे पहाता पाणीपुरीचे अनेक प्रकार आहेत. देशातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची पाणीपुरी समोर आली आहे. परंतु पाणीपुरीसंदर्भात एक असा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून पाणीपुरी प्रेमींना धक्का बसणार आहे. कदाचित यानंतर ते पुन्हा कधीही पाणीपुरीकडे पाहाणार नाही. सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे की, जेथे दिवसेंदिवस काही ना काही व्हिडीओ पोस्ट होत असतात. त्यातील काही मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे लोकांना माहिती देणारे असतात.

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे, ज्याने स्टॉलवर किंवा गाडीवर खाद्यपदार्थ खाण्याऱ्या लोकांना धक्का बसला आहे.

खरेतर गुवाहाटीमध्ये, एका पाणीपुरीच्या स्टॉलवरील एक व्यक्ती एका भांड्यात लघवी करत आहे आणि ती लघवी तो पाणीपुरीच्या पाण्याच मिसळत आहे. हे खरोखरच खुप किळसवाणं आहे. जे पाहिल्यानंतर तुमच्या तोंडातील पाणीपुरीची चव ही बेचव होऊन जाईल आणि तुम्ही कधीही पुन्हा पाणीपुरी खाणार नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, पाणीपुरीवाला आधी लघवी करतो आणि नंतर तिच लघवी पाणापुरीच्या पाण्यात टाकून मग लोकांना ती खायला देतो.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीवर कारवाई केली. या अन्न विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने गुवाहाटीच्या आठगाव भागात आपला स्टॉल लावला होता.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आपला राग व्यक्त करत आहे. या व्यक्तीच्या अशा कृत्यामुळे प्रत्येक जण खूप संतापलेला आहे आणि या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची विनंती करत आहे.