केस मोकळे सोडून जत्रेच्या पाळण्यात बसली अन्... क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा थरारक Video

Gujarat Ferris Wheel Video : जत्रेत मजा करायला आलेल्या तरुणीचे केस चक्क आकाश पाळण्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असा वाचवला जीव...

Updated: Sep 30, 2023, 07:10 PM IST
केस मोकळे सोडून जत्रेच्या पाळण्यात बसली अन्... क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा थरारक Video title=
Gujarat Ferris Wheel Viral Video

Gujarat Viral Video : लहानपणी तुम्ही कधी गावच्या जत्रेत गेलाय का? गेला असाल तर मोठमोठी पाळणे (Ferris Wheel) बघितलेच असतील. उंचच्या उंच दिसणाऱ्या पाळण्यात बसल्यावर आभाळ देखील ठेंगणं होतं. लहानमुलांमध्ये मोठ्या पाळण्याबद्दलची मोठी उत्सुकता असते. एवढंच काय तर मोठ्या मुलांना आणि तरुणांना देखील मोठ्या पाण्यात बसण्याची इच्छा असते. अशातच आता एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Viral Video) समोर आला आहे. गुजरातच्या खंभालिया या गावातील हा व्हिडीओ असल्याचं समोर आलंय. या घटनेमध्ये एका तरुणीचा जीव थोडक्यात वाचला आहे.

गुजरातच्या खंभालियामध्ये केस मोकळे सोडून पाळण्यात बसलेल्या तरुणीसोबत भयंकर घटना घडली. पाळणा खाली येत असताना तरुणीचे केस पाळण्याच्या लोखंडी बारमध्ये अडकले अन् परिसरात मोठी खळबळ उडाली. तरुणी जीवाच्या आकांताने ओरडत होती. त्यावेळी काही तरुणांनी धाडस दाखवत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Gujarat Ferris Wheel Video) झाल्याचं दिसून येतंय.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dev Bhumi Dwarka District (@amazingdwarka)

झालं असं की, गावात जत्रा भरल्याने लोकांनी गर्दी जमवली. एक तरुणी जत्रेत फिरण्यासाठी आली. देवाचं दर्शन घेतलं अन् बाजारात फिरण्यास सुरूवात केली. त्यावेळी तिने आकाश पाळणा पाहिला. त्यावेळी तिला आकाश पाण्यात बसण्याचा मोह आवरला नाही. तिने पैसे दिले अन् पाळण्यात बसली. पाळणा सुरू होताच तिने आनंद लुटला. मात्र, त्याचवेळी तिने केस मोकळे सोडले होते, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. केस लोखंडी रॉडमध्ये अडकले. त्यावेळी तरुणी वेदनेने रडत होती, काही लोकांनी हा प्रकार पाहिला अन् पाळणा थांबवायला लावला. काही वेळाने तरुणांनी महिलेची केसं कापली अन् महिलेची सुटका केली.

आणखी वाचा -मानलं भावा! 5 किमीच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत केली Pizza ची डिलिव्हरी; चालकानेही जोडले हात 

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ amazingdwarka या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. या घटनेमुळे काही वेळ भितीचं वातावरण तयार झालं होतं. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत लोकांना सल्ले दिले आहेत.