आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट, नेमबाजीत रौप्य

भारतीय नेमबाजांकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरुच आहे. 

Updated: Aug 23, 2018, 05:24 PM IST
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट, नेमबाजीत रौप्य

नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरुच आहे.  १५ वर्षीय शार्दूल विहाननं डबल ट्रॅप प्रकारात भारताला रौप्य पदक पटकावून दिलं. उत्तर प्रदेशच्या या नेमबाजानं ७३ शॉट  मारत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. 

या आशियाई क्रीडा सपर्धेतील पदक पटकावणारा तो सर्वात युवा नेमबाज ठरलाय. कोरियाच्या शिन ह्युयानवूननं सुवर्ण पदकाची कमाई केली. दरम्यान, गेल्यावर्षी शार्दूलनं शॉटगन नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्ण पदकं जिंकण्याची किमया साधली होती.