Viral News : लाखमोलाच गिफ्ट!दुकानदाराची माणूसकी पाहून डोळ्यात पाणी येईल, पाहा VIDEO

Viral News : ज्या व्यक्ती इतरांना त्यांच्या अडचणीत निस्वार्थपणे मदत करतात, त्याच व्यक्ती खरे माणूसकीचे दर्शन घडवत असतात.असे अनेक व्हिडिओ (Video Viral) दररोज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात.

Updated: Dec 5, 2022, 05:17 PM IST
Viral News :  लाखमोलाच गिफ्ट!दुकानदाराची माणूसकी पाहून डोळ्यात पाणी येईल, पाहा VIDEO

Viral News : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यातील काही  व्हिडिओ प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात, तर काही व्हिडिओ प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देत असतात.असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओतील दुकानदारांची (Shopkeeper) माणूसकी पाहून अनेकांच मन भरून आले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आल आहे.  

...तीच खरी माणूसकी 

ज्या व्यक्ती इतरांना त्यांच्या अडचणीत निस्वार्थपणे मदत करतात, त्याच व्यक्ती खरे माणूसकीचे दर्शन घडवत असतात.असे अनेक व्हिडिओ (Video Viral) दररोज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. या व्हिडिओतील व्यक्तींची माणूसकी पाहून अनेकांच्या डोळे पाणावत असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

व्हिडिओत काय? 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Video Viral) एक व्यक्ती त्याच्या दुकानात बसलेला दिसत आहे. या दरम्यान त्याच्यासमोर आणखी एक व्यक्ती येतो. हा व्यक्ती त्याच्याकडे पैसे काढण्यासाठी येतो. दुसरीकडे, दुकानदार (Shopkeeper) दुसर्‍या व्यक्तीला पैसे देतो तेव्हा ती व्यक्ती खिशात ठेवलेल्या प्लास्टीकची पिशवी काढते. या प्लास्टीकच्या पिशवीत त्याचे पैसे आणि महत्वाचे कागदपत्र असतात. त्याचे हे पाकिट पाहून दुकानदाराचे हृदय पिळवटून जाते.यानंतर जे काही घडते ते पाहून तुमचे देखील मन भरून येईल.

व्हिडिओमध्ये त्या गरीब व्यक्तीच पाकिट पाहून अनेकांना त्याची किव येते. दुकानदार (Shopkeeper) हे दृष्य पाहून थक्क होतो. त्यानंतर दुकानदार त्या व्यक्तीला त्याच्या वतीने एक पर्स भेट देतो आणि त्यात पैसे ठेवण्यास सांगतो.यावेळी त्या व्यक्तीच्या तोंडावर लाखमोलाची स्माईल येते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना अजूनही माणूसकी जिवंत असल्याचा उदाहरण पाहायला मिळालं. 

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ (Viral video) विकास यादव नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने त्याच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला 6 लाख व्ह्यूज आणि एक लाख 14 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओतील दुकानदाराच्या माणूसकीचे नेटकरी कौतूक करतायत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची (Viral video) सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.