मुंबई : Sigachi Industries Stock Market Listing : केमिकल बनवणारी कंपनी Sigachi Industries च्या शेअरची बाजारात एंट्री झाली आहे. हा स्टॉक बीएससीवर (BSE) साधारण 253 टक्क्यांच्या प्रीमियामवर लिस्ट झाला आहे. Sigachi Industriesने IPO च्या शेअरसाठी 163 रुपयांचा भाव निश्चित केला होता तर कंपनीचा शेअर 575 च्या वर लिस्ट झाला आहे.
Sigachi Industries च्या आयपीओ बाबत झी बिझनेसचे संपादक अनिल सिंघवी यांचे म्हणणे आहे की, सिंघाची इंडस्ट्रीच्या परफॉमन्सने आश्चर्यचकीत केले आहे. 200 कोटींचा महसूल आणि 30 कोटींचा नफा असलेल्या कंपनीला गुंतवणूकदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
सध्या गुंतवणूकदारांनी लिस्टिंग प्राइज खाली 50 रुपयांचा स्टॉप लॉस लावून गुंतवणूक सुरू ठेवणे फायद्याचे ठरेल. शेअरचा भाव जसा वाढत जाईल तसा स्टॉप लॉस ट्रेल करीत रहा
लिस्टिंग नंतर तेजी
सिंघाची इंडस्ट्रीजमध्ये लिस्टिंगनंतर तेजी आहे. शेअर 575 वर लिस्ट झाल्यानंतर 604 रुपयांपर्यंत पोहचला. म्हणजेच लिस्टिंगपेक्षा जास्त वाढ शेअरमध्ये दिसून आली आहे. शेअरसाठी आजचा निच्चांक 570 रुपये आहे.