नवी दिल्ली : राष्ट्रपती भवन येथे तैनात असलेल्या 'आर्मी गार्ड बटालियन'मध्ये आज औपचारिक बदल करण्यात आला. आर्मी गार्ड बटालियन म्हणून साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या गोरखा रायफल्स बटालियनची जागा शिख रेजिमेंटच्या बटालियनने घेतली आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते.
साडेतीन वर्षांचा कार्यकाळ
2017 मध्ये राष्ट्रपती भवनाची जबाबदारी सांभाळण्याऱ्या 5 व्या गोरखा रायफल्सच्या बटालियनने वर्ष साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. आता ही जबाबदारी शीख रेजिमेंटच्या शीख रेजिमेंटच्या 6 व्या बटालियनला देण्यात आली आहे. 2014 पर्यंत, बटालियनचा हा बदल सार्वजनिकपणे आयोजित करण्यात येत नव्हता.
राष्ट्रपती भवनमध्ये सैन्य दलाच्या 2 तुकड्या असतात. त्यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे राष्ट्रपतींचे अंगरक्षक, पीबीजी जे नेहमी राष्ट्रपतींसोबत असतात. त्याच बरोबर दुसरी बटालियन राष्ट्रपती भवनात असते. राष्ट्रपती आणि इतर देशांमधून आलेल्या मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर देण्याची त्यांची मुख्य भूमिका आहे. या व्यतिरिक्त, विविध प्रसंगी दक्षिण ब्लॉकची जबाबदारी तसेच संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाची जबाबदारी देखील त्यांचीच असते.
The 5th Battalion of the 1st Gorkha Rifles, on completion of its three and half years tenure as Ceremonial Army Guard Battalion, handed over the charge to the 6th Battalion of the Sikh Regiment. pic.twitter.com/oD899FTezN
— President of India (@rashtrapatibhvn) November 28, 2020
राष्ट्रपती भवनातील विविध महत्त्वाचे कार्यक्रम जसे देशातील मान्यवरांच्या भेटीसाठी औपचारिकता, प्रजासत्ताक दिन परेड, स्वातंत्र्यदिनी परेड, बीटिंग रिट्रीट इ. येथे तैनात असलेल्या आर्मी गार्ड बटालियनची जबाबदारी आहे.
President Kovind witnessed the Ceremonial change-over of the Army Guard Battalion stationed at Rashtrapati Bhavan today. pic.twitter.com/SIHdL7hoDF
— President of India (@rashtrapatibhvn) November 28, 2020
शीख रेजिमेंटचा इतिहास
राष्ट्रपती भवनात आता तैनात शीख रेजिमेंटच्या बटालियनचा इतिहास 150 वर्षांहून अधिकचा आहे. त्याची स्थापना 1846 मध्ये ब्रिटीशांनी केली होती. आतापर्यंत त्यांना 2 परमवीर चक्र, 14 महावीर चक्र, 5 कीर्ती चक्र, 67 वीर चक्र आणि इतर 1596 इतर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केवळ दोन बटालियनसह प्रारंभ झालेल्या या रेजिमेंटमध्ये आता 19 रेग्युलर आणि दोन नियमित बटालियन आहेत.