Wedding Video: दीराच्या लग्नात वहिनीचं असं वागणं योग्य आहे का?

नवरदेव लग्नासाठी तयार नाही, पण वहिनी मात्र....

Updated: Jul 31, 2021, 02:08 PM IST
Wedding Video: दीराच्या लग्नात वहिनीचं असं वागणं योग्य आहे का? title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर लग्न समारंभातील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. आता वहिनी आणि दीराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी वहिनी आणि दीराचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला. पण आता वहिनी आणि दीराचा व्हिडिओ पाहून तुम्हाला प्रश्न पडेल की वहिनी असं का करत आहे. वहिनीचं हे असं वागणं योग्य आहे का?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर सध्या  एका व्यक्तीच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नवरदेवासोबत जी महिला दिसत आहे, ती नवरदेवाची वहिनी असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये वहिनी अत्यंत आनंदी दिसत आहे. पण वहिनीच्या अशा वागण्यामुळे सध्या चर्चा रंगत आहे. 

लग्नाच्या व्हिडिओमध्ये नवं जोडपं उभं आहे. व्हिडिओमध्ये कुंकू भरण्याची विधी सुरू असते. नवरदेव विधी करण्यासाठी आनंदी नव्हता. तेव्हा वहिनी बळजबरी  नवरदेवाचे हात पकडून  नवरीच्या डोक्यात कुंकू भरते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.