मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर येथून बुधवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका भरधाव जाणाऱ्या बसने पायी घरी जाणाऱ्या मजुरांना चिरडले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जखमी झाले आहेत. त्यातील काहीजणांची प्रकृतीही गंभीर आहे. रस्त्याच्या बाजुने हे मजूर आपल्या घरी चालले होते. लॉकडाऊनमुळे वाहन नसल्याने तसेच हाताला काम नसल्याने हे मजूर रस्त्याने पायी जात होते.
6 migrant workers who were walking along the Muzaffarnagar-Saharanpur highway killed after a speeding bus ran over them late last night, near Ghalauli check-post. Case registered against unknown bus driver. pic.twitter.com/s81e7gpYkH
— ANI UP (@ANINewsUP) May 14, 2020
बुधवारी रात्री उशिरा मुजफ्फरनगर-सहारनपूर राज्य महामार्गावरील घौली चेक पोस्टसमोर रोहणा टोल प्लाझाजवळ पंजाबहून पायी परत जात असलेल्या बिहारमधील कामगारांना वेगवान जाणाऱ्या बसने चिरडले. यामुळे सहा कामगार जागीच मरण पावले आणि त्यांचे साथीदार जखमी झाले.
हे मजूर रात्री उशिरा पंजाबहून पायी आपल्या गावी परत होते. हे कामगारांनी सिटी कोतवाली भागात पोहोचले होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव बसने त्यांना चिरडून टाकले. या अपघात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व कामगार मूळचे बिहारचे असून ते पंजाबहून पायी घरी परतत होते.
या दुखद घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि जखमी कामगारांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगार हे बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील रहिवासी असून ते पंजाबहून पायी परतत होते.