रामनगर मतदान केंद्रावर गोंधळ

कर्नाटकमध्ये रामनगर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक सुरु आहे. सकाळपासून मतदानालाही सुरूवात झालीय. मात्र सकाळी रामनगरमधील एका मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

Updated: Nov 3, 2018, 05:08 PM IST
रामनगर मतदान केंद्रावर गोंधळ

रामनगर : कर्नाटकमध्ये रामनगर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक सुरु आहे. सकाळपासून मतदानालाही सुरूवात झालीय. मात्र सकाळी रामनगरमधील एका मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

इथल्या एका मतदान केंद्रात साप आढळल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांची धावपळ झाली. त्यामुळे काही काळासाठी मतदान थांबवण्यात आलं होतं. यानंतर सापाला मतदान केंद्राबाहेर काढण्यात आलं आणि मतदान पुन्हा एकदा सुरू झालं.