वैष्णो देवी मंदिराच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी

वैष्णो देवीचं मंदिरही बर्फाच्छादित झालं आहे.

Updated: Dec 14, 2019, 09:34 AM IST
वैष्णो देवी मंदिराच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी  title=

नवी दिल्ली : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वैष्णो देवी मंदिराच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. वैष्णो देवीचं मंदिरही बर्फाच्छादित झालं आहे. मंदिर परिसरात जवळपास दीड फूट बर्फ साचलं आहे. दूरदूरवर बर्फाची चादर पसरलेली दिसते आहे. केदारनाथमध्येही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आहे. मंदिराबाहेर जवळपास ५ फूट बर्फ साचला आहे. या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी पर्यटकांनी मात्र या बर्फवृष्टीचा आनंद लुटला आहे.

उत्तराखंडमध्ये ही जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फाचा खच जमा झाला आहे. नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ही अनेक भागात बर्फवृष्टी झाली आहे.

हिमाचलप्रदेश येथे ही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

बर्फवृष्टीमुळे शिमल्यातील वातावरण ही बदललं आहे.