सोनाली , ड्रग्ज आणि धोका... सोनालीच्या हत्येमागचं गूढ अखेर उकललं

टिकटॉक स्टार सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट

Updated: Aug 26, 2022, 10:48 PM IST
सोनाली , ड्रग्ज आणि धोका... सोनालीच्या हत्येमागचं गूढ अखेर उकललं   title=

Sonali Phogat Death : टिकटॉक स्टार सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. मृत्यूपूर्वी सोनालीला जबरदस्तीनं सिंथेटीक ड्रग्ज देण्यात आलं होतं आणि ओव्हर ड्रग्जमुळेच सोनालीचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. सोनालीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी अनेक कंगोरे तपासून पाहिले. 

यातला पहिला धागा हाती लागला तो सीसीटीव्हीच्या रूपात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि सोनालीचा पीएस सुधीर आणि सोनालीचा मित्र सुखविंदर हे तिच्यासोबत पार्टी करत होते. त्यानंतर त्यांनी तिला जबरदस्तीनं काहीतरी पाजलं. हे कोणतंही कोल्ड्रींक किंवा दारू नव्हती. तर ते होतं सिंथेटीक ड्रग्ज. चौकशीदरम्यान या दोघा आरोपींनी ही कबुली दिलीय. मात्र तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा कुठलाही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. 

पोलिसांच्या कारवाईपूर्वी सोनालीच्या कुटुंबीयांनी अनेक सवाल उपस्थित केले होते. याच प्रश्नांनी पोलिसांच्या तपासाला नवी दिली. त्यातूनच अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. सोनालीचा मृत्यू नैसर्गीक होता की हत्या? कुणी रचला सोनालीच्या हत्येचा कट? कुणी दिलं सिंथेटीक ड्रग्ज ? या सगळ्या प्रश्नांमागे एक हृदय हेलावून टाकणी कहाणी आहे. सोनालीच्या कुटुंबीयांनी ही कहाणीच पोलिसांसमोर मांडली, त्यांनी केलेले आरोप हेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महत्त्वाचे ठरलेत.

फोगट यांच्या कुटुंबाचे आरोप
आरोप 1 - पीए सुधीरनं सोनाली यांच्यावर रेप केला

आरोप 2 - व्हिडिओ तयार करुन सोनाली यांना ब्लॅकमेल केलं

आरोप 3 - संपत्तीसाठी पीए सुधीरनं हत्या केली

आरोप 4 - पीएनं मित्र सुखविंदरसह सोनालींची हत्या केली

आरोप 5 - हत्येनंतर पीएनं सोनाली यांचा फोन बंद केला

अभिनेत्री सोनाली फोगट ही टिकटॉक स्टार होती. सोशल मीडियात तिचे लाखो फॉलोअर्स होते. सुरूवातीला तिचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाला असावा अशी बातमी आली. मात्र सोनालीला जबरदस्तीनं सिंथेटीक ड्रग्ज पाजल्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळालंय.  

सोनाली मृत्यूप्रकरणा प्रमाणेच अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचं प्रकरणही चांगलच चर्चेत राहिलं होतं. मात्र सुशांतसिंह प्रकरणात कुणाविरोधात फारसे पुरावे न लागल्यानं त्याच्या मृत्यूचं गूढ गुलदस्त्यातच राहिलं. मात्र आरोपी सोनालीचे निकटवर्तीयच आहेत. आणि त्यांनी तिला नेमकं कशासाठी ड्रग्ज पाजलं. नेमक या तिघांमध्ये काय घडलं या कळीच्या मुद्द्यांचा उलगडा अजून व्हायचाय. त्यामुळे या ड्रग्ज, धोका आणि मर्डरचं गूढ कायम आहे.