Sovereign Gold Bond scheme 2021-22 | सरकारकडून सर्वात स्वस्त सोने खरेदीची संधी

Sovereign Gold Bond scheme 2021-22 (Series IX): जर तुम्ही स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजपासून पाच दिवसांची संधी आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) Sovereign  सुवर्ण रोखे योजनेची नववी Series आजपासून सुरू झाली आहे.

Updated: Jan 10, 2022, 04:31 PM IST
Sovereign Gold Bond scheme 2021-22 | सरकारकडून सर्वात स्वस्त सोने खरेदीची संधी title=

मुंबई : Sovereign Gold Bond scheme 2021-22 (Series IX): जर तुम्ही स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजपासून पाच दिवसांची संधी आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) Sovereign  सुवर्ण रोखे योजनेची नववी series आजपासून सुरू झाली आहे. ही योजना पाच दिवस सुरू झाली आहे. त्यात 14 जानेवारीपर्यंत गुंतवणूक करता येईल.

सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची इश्यू किंमत
सरकारने आठव्या seriesच्या इश्यूच्या तुलनेत नवव्या series मध्ये प्रति ग्रॅम 5 रुपयांनी कपात केली आहे. आठव्या मालिकेसाठी 4791 रुपये प्रति ग्रॅम आणि नवव्या मालिकेसाठी 4786 रुपये इश्यूची किंमत निश्चित करण्यात आली होती. ग्राहकांना यामध्ये गुंतवणूक करायची असल्यास http://onlinesbi.com या संकेतस्थळावर भेट देता येईल.

डिजिटल पद्धतीने अर्ज करण्यावर सूट
जर तुम्हाला Sovereign  गोल्ड बाँड्समध्ये गुंतवणूक करायची असेल, तर डिजिटल पद्धतीनेही करता येते. कारण रिझर्व्ह बँक डिजिटल सबस्क्रिप्शनवर प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देते. म्हणजेच 4736 रुपये प्रति ग्रॅम या दराने तुम्ही ऑनलाइन सोने खरेदी करू शकता.

Sovereign  गोल्ड बाँड कोठे सबस्क्राइब करावे?
Sovereign  गोल्ड बाँड स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक वगळता, सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SHCIL), नियुक्त पोस्ट ऑफिसेस मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE) मध्ये खरेदी करता येतील.

ऑनलाइन गुंतवणूक कशी करावी?
NSE वर गोल्ड बाँड्सची युनिट्स खरेदी करा आणि तुमच्या डिमॅट खात्याशी लिंक केलेल्या खात्यातून त्याच्या किमतीइतकी रक्कम वजा केली जाते.

मॅच्युरिटी किती वर्षांनी
Sovereign गोल्ड बाँडची मॅच्युरिटी 8 वर्षे आहे. परंतु पाच वर्षांनंतर या योजनेतून बाहेर पडू शकता. Sovereign गोल्ड बाँडमध्ये, गुंतवणूकदाराने किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

 गरज भासल्यास, गुंतवणूकदार Sovereign सुवर्ण रोख्यावर कर्ज देखील घेऊ शकतो परंतु सुवर्ण रोखे तारण ठेवावे लागतील.