सपाच्या नेत्यांनी घेतली मायावती यांची भेट

यूपीमध्ये गोरखपूर आणि फुलपूरमध्ये लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.

shailesh musale Updated: Mar 14, 2018, 04:08 PM IST
सपाच्या नेत्यांनी घेतली मायावती यांची भेट title=

लखनऊ : यूपीमध्ये गोरखपूर आणि फुलपूरमध्ये लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.

विरोधी पक्ष नेता आणि सपाचे नेते राम गोविंद चौधरी यांनी या नंतर बसपाच्या अध्यक्षा मायावती यांची भेट घेतली.

दूसरीकडे फुलपुरमध्ये देखील भाजपची पिछाडी झाली आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं की, 'मतदान चांगलं झाल्याने कदाचित हा निर्णय आला. भाजपच्या मानसिकतेचे मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नाहीत.'