दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे 'हे' मंदिर, दर्शनासाठी भक्तांना ताटकळत राहावं लागतं

Shree Stambheshwar Mahadev Temple: भारतात अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची एक वेगळी कथा सांगितली जाते. असंच एक मंदिर गुजरातेत आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 22, 2024, 04:35 PM IST
दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे 'हे' मंदिर, दर्शनासाठी भक्तांना ताटकळत राहावं लागतं title=
Stambheshwar Mahadev temple that vanishes twice a day in gujrat

Shree Stambheshwar Mahadev Temple: भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक मंदिरे आहेत जिथे गेल्यावरही मनाला शांती लाभते. भारतात 10 लाखाहून अधिक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा वेगळा इतिहास आहे. त्यामुळं लोकांचा विश्वासही दृढ होत गेला आहे. 

गुजरातमध्येही असंच एक मंदिर आहे जे त्याच्या रहस्यमय अस्तित्वामुळं प्रसिद्ध आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरहून जवळपास 175 किमी लांब असलेल्या जंबूसरच्या कवी कंबोई गावात हे मंदिर आहे. या मंदिराच्या रहस्य पाहून अनेक जण आश्चर्यचकित होत आहेत. भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर आहे. हे मंदिर 150 वर्षांपूर्वीचा आहे. हे मंदिर अरबी समुद्रात आणि खंभातच्या खाडीने वेढलेले आहे. हे मंदिर पाहण्यासाठी खूप दूरुन लोक येतात. 

मंदिराची आख्यायिका काय?

शिवपुराणानुसार तारकासुर नावाच्या राक्षसाने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी खूप खडतर तपस्या केली होती. अशातच भगवान तारकासूराची तपस्येने खुश झालेल्या महादेवांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले. तारकासुरने वरदान मागितले की महादेवपुत्रांच्या ऐवजी कोणी त्याचा वध करु शकत नाही. मात्र यावेळी त्या पुत्राचे वय 6 दिवसांपेक्षा अधिक नसावे. 

महादेवाने तारकासुरला वरदान दिल्यानंतर त्याने सामान्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. अशातच देवतांनी तारकासुराचा वध करावा, अशी महादेवांना गळ घातली. त्यानंतर श्वेत पर्वत कुंडातून जन्मलेल्या कार्तिकेयने तारकासुराचा वध केला. मात्र, जेव्हा महादेवाने याबाबत समजले तेव्हा त्यांना खुप दुखः झाले. कार्तिकेय यांना जेव्हा त्यांच्या चुकीची जाणीव झाली तेव्हा भगवान विष्णु यांनी त्याना प्रायश्चित करण्याची संधी दिली. 

भगवान विष्णु यांनी कार्तिकेय यांना सल्ला दिला की, जिथे असुराचा वध केला तिथेच शिवलिंगाची स्थापना करावी. भगवान विष्णुंच्या म्हणण्याप्रमाणे कार्तिकेयांनी तसेच केले. त्यानंतर हे मंदिर स्तंभेश्वर मंदिराच्या नावाने ओळखले जाऊ लागले. बऱ्याच जणांना माहिती नाहीये की हे मंदिर सकाळी- संध्याकाळी दोनदा समुद्रात लुप्त होते. 

मंदिरात लुप्त होणाऱ्या या मंदिराला वैज्ञानिक कारण आहे. हे मंदिर समुद्राच्या पाण्याने वेढलेले आहे. अशावेळी जेव्हा दिवसातून दोनदा समुद्राची पातळी वाढते तेव्हा मंदिर पूर्णपणे पाण्यात लुप्त होते. मात्र, जेव्हा पाण्याचा स्तर कमी होतो तेव्हा मंदिराचे पुन्हा दर्शन होते. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार, समुद्राच्या पाण्याने महादेवाचे जलाभिषेक होतो. निसर्गाचा हाच चमत्कार पाहण्यासाठी लोक सकाळ-संध्याकाळपर्यंत येथे थांबतात. 

स्तंभेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री आणि अमावस्येला मोठी जत्रा भरते. प्रदोष-ग्यारस आणि पौर्णिमेला रात्रभर येथे पूजा-अर्चा होते. आजूबाजूच्या गावातील लोक येथे दर्शनासाठी येतात. असं म्हणतात की, महादेवाचे दर्शन घेतल्याने सर्व कष्ट दूर होतात. शिव पुराणातही याचा उल्लेख आढळतो. रुद्र संहिता भाग 2 अध्याय 11 आणि पृष्ठ संख्या 358मध्ये उल्लेख आढळतो. 

कसं पोहोचाल?

हे मंदिर गुजरात शहराच्या बडोदरापासून एकूण 85 किमी अंतरावर स्थित आहे. तुम्ही हवं तर बस-ट्रेन किंवा विमानाने बडोदरापर्यंत जाऊ शकता. येथून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अनेक साधने मिळू शकतात. मंदिराच्या जवळ पार्किंगची सुविधादेखील आहे.