न्यायाधीशांच्या खटले वाटपावरून झालेल्या वादावर पडदा

सर्वोच्च न्यायायलयाच्या चार न्यायाधीशांनी खटले वाटपावरून निर्माण झालेल्या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.  

Updated: Feb 2, 2018, 09:32 AM IST
न्यायाधीशांच्या खटले वाटपावरून झालेल्या वादावर पडदा title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायायलयाच्या चार न्यायाधीशांनी खटले वाटपावरून निर्माण झालेल्या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.  

दीपक मिश्रा स्वतः करणार सुनावणी

१२ जानेवारीला नोंदवलेल्या आक्षेपांनंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या सहीनं सर्वोच्च न्यायालयाच्या खटलेवाटपासंदर्भात एक अधिसूचना काढण्यात आलीय. या तेरा पानांच्या अधिसूचनेनुसार यापुढे जनहित याचिकाची सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा स्वतः करणार आहेत. 

११ न्यायाधीशांची सूची जारी

याशिवाय खटल्याचं वाटप करण्यासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार ११ न्यायाधीशांची सूचीही अधिसूचनेत जारी करण्यात आलीय.

काय होता वाद?

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनावर अनेक आरोप केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सर्वोच्च न्यायायलयाच्या खटले वाटपावरून हा वाद निर्माण झाला होता.