ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, देशाचे लक्ष

Gyanvapi Masjid Update : ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी आहे.  

Updated: May 17, 2022, 07:56 AM IST
ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, देशाचे लक्ष title=

नवी दिल्ली : Gyanvapi Masjid Update : ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी आहे. ज्ञानवापी मशिदीमधील सर्वेक्षणाविरोधात मशिद व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. व्यवस्थापनाच्या या याचिकेच्या विरोधात हिंदू सेनाही सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. ही याचिका दंड लावून फेटाळली जावी अशी मागणी हिंदू सेनेने केली आहे.  

दरम्यान, ज्ञानवापी मशिदीत काल वुझूसाठी असलेल्या तलावात एक शिवलिंगासारखा दिसणारा अवशेष सापडलाय, असा दावा हिंदू पक्षकारांनी केला. त्यावर हिंदू पक्षकारांतर्फे वाराणसी सिव्हील कोर्टात अर्ज करण्यात आला. त्यानुसार आता ज्ञानवापी मशिदीत कोर्टाने या अवशेषांना संरक्षण देण्याचे आदेश दिलेत. तसंच वुझूखानाही सील करण्यात आलाय. मशिदीत केवळ 20 जणांनाच नमाज अदा करण्याची मुभा आहे. याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तीव्र आक्षेप घेतला आहे. 

ज्ञानवापी सर्वेक्षणाविरोधातील याचिकेवर सुनावणी होत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. वाराणसीच्या अंजुमन इनानिया मस्जिदच्या व्यवस्थापन समितीने ही याचिका दाखल केली आहे. सर्वेक्षणाला परवानगी देणारा आदेश प्रार्थनास्थळ कायद्याच्या विरोधात असल्याचे याचिकेत म्हटले आहे.