नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या रशियन युवकाला मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
या युवकावर आपल्या एटीएम कार्डाचा पीन लॉक झाल्यावर कांचीपुरमच्या एका मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ आली.
सुषमा स्वराज यांनी ट्विट करून म्हटले की 'इवनगेलीन, रशिया आमचा मित्र देश आहे. चेन्नईमधील अधिकारी तुमची सर्वतोपरी मदत करतील. पोलिसांनी सांगितले की तामिळनाडू फिरायला आल्यावर २४ वर्षीय रशियन युवकाचे एटीएम कार्डाचे पीन लॉक झाले. त्यामुळे त्याला पैसे काढता येत नाही. त्यामुळे त्याला भीक मागावी लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इवगेलीन नावाचा हा युवक काही दिवसांपासून कांचीपुरमच्या श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिराबाहेर भीक मागत आहे. एक परदेशी नागरिक रस्त्यावर बसून भीक मागत होता, हे पाहून लोकांनी पोलिसांना सांगितले त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याकडे असलेल्या कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. ते योग्य असल्याचे निष्पन्न झाले.
Evangelin - Your country Russia is our time tested friend. My officials in Chennai will provide you all help. https://t.co/6bPv7MFomI
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) October 10, 2017
त्याच्याकडे भारतात अजून एक महिना राहण्याचा व्हीसा आहे. त्याची हालत पाहून पोलिसांनीच त्याला चैन्नईपर्यंत जाण्याचे पैसे दिले. विशेष म्हणजे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतात अडचणीत सापडलेल्या परदेशी नागरिकाला मदत केली होती. त्याला व्हिसा देऊन आपल्या देशात पाठविले होते.