मुंबई : ऑनलाईन फुड डिलीवरी करणारी कंपनी स्विगीने देशातील 5 मोठ्या शहरांमधील सुपरडेली सर्विस बंद करण्याची घोषणा केली आहे. सुपर डेली सर्विस अंतर्गत कंपनी दूध, दैनंदिन वापराच्या गोष्टी आणि ग्रॉसरीची डिलीवरी करते. ही सर्विस सब्सक्रिप्शनवर आधारित आहे. म्हणजेच ग्राहकांना या सर्विससाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागते.
या सर्विसला बंद करण्यामागचे कारण म्हणजेच स्विगीला होत असलेला तोटा होय. महागाईच्या या आव्हानात्मक काळात गुंतवणूक आणि खर्चाचा ताळमेळ राखण्यावर कंपनीचा फोकस आहे. कंपनी आतापर्यंत नफ्यात आलेली नाही.
स्विगीची सुपर डिलीवरी सर्विस ज्या शहरांमध्ये बंद झाली आहे. त्या शहरांमध्ये दिल्ली एनसीआर, मुंबई, चैन्नई, पुणे आणि हैद्राबादसारखी शहरे सामिल आहेत. 12 मे 2022 पासून या शहरांमधील सर्विस बंद होणार आहेत.
कंपनीने नवीन ऑर्डर घेणे 10 मे पासूनच बंद केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, ज्या ग्राहकांच्या वॉलेटमध्ये पैसे उरले आहेत. त्यांना ते परत दिले जाणार आहेत. 5-7 दिवसात हे पैसे रिफंड होतील.