Relation Tips: पहिल्यांदा डेटवर जाताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, चांगलं इम्प्रेशन पडेल

प्रेम मिळवण्यासाठी केवळ सुंदर दिसणं पुरेसं नाही. प्रेमाचं नातं घट्ट कसं करावं याबाबतही काळजी घेणं गरजेचं आहे.

Updated: Jul 25, 2022, 01:04 PM IST
Relation Tips: पहिल्यांदा डेटवर जाताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, चांगलं इम्प्रेशन पडेल title=

Tips For Date: प्रेम मिळवण्यासाठी केवळ सुंदर दिसणं पुरेसं नाही. प्रेमाचं नातं घट्ट कसं करावं याबाबतही काळजी घेणं गरजेचं आहे. लहानसहान गोष्टी जोडप्यांना जवळ आणत असतात. त्यामुळे डेटवर जाताना पहिल्यांदा गिफ्ट, पसंत-नापसंत आणि काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणते कपडे घालावेत? कोणत्या सवयी टाळाव्यात? काय खावं काय खाऊ नये? यासारख्या गोष्टी विचारात घेतल्या पाहीजेत. त्याचबरोबर काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहीजेत. चला तर जाणून घेऊयात डेटवर जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 

मैत्रीचा हात पुढे

डेटवर गेल्यानंतर घाईघाईत कोणतीही गोष्ट सहज सांगू नका. सर्वात आधी व्यक्तीकडे मैत्रीचा हात पुढे करा. मैत्री केल्याने बोलण्यात सहजता येते आणि संवाद होण्यास सुरुवात होते. दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहीजे.

देहबोली सुधारा

तुम्ही तुमच्या देहबोलीवर काम केले पाहिजे. तुमची देहबोली चांगली असेल तर तुमची भेट यशस्वी ठरेल. यासाठी तुम्हाला देहबोलीवर काम करावे लागेल आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याचबरोबर तुतुम्ही वापरत असलेली भाषा चांगली असेल याचीही काळजी घ्यावी लागेल.

योग्य जागा निवडा

तुम्ही डेटवर जात असाल तर योग्य ठिकाण निवडा. जागेचा मूडवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो, म्हणून एखादे ठिकाण निवडणे महत्वाचे आहे. जेणेकरून आपण पुढील व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवू शकाल. बरेच लोक त्याकडे लक्ष देत नाहीत.