Multibagger Returns:टाटा ग्रुप शेअरने फक्त 11 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, एका वर्षात 978 टक्के परतावा

टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड (TTML) चे शेअर्स तेजी दर्शवत आहेत. मागील 11 दिवसात हा स्टॉक 93.40 रुपयांवरून 152  रुपये (TTML) वर आला आहे. 

Updated: Mar 25, 2022, 05:17 PM IST
Multibagger Returns:टाटा ग्रुप शेअरने फक्त 11 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, एका वर्षात 978 टक्के परतावा title=

मुंबई : टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड (TTML) चे शेअर्स तेजी दर्शवत आहेत. मागील 11 दिवसात हा स्टॉक 93.40 रुपयांवरून 152  रुपये (TTML) वर आला आहे. बुधवारी या शेअरमध्ये अपर सर्किट लागला होता. एका वर्षात या कालावधीत TTML शेअरने 978.01% परतावा दिला आहे.

केवळ 11 दिवसांमध्ये TTML च्या शेअरधारक त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर सुमारे 59 रुपये नफा दिला आहे. 8 मार्च रोजी या शेअरची किंमत 93.40 रुपये होती, जी बुधवारी अपर सर्किटसह NSE वर 152.00 रुपये झाली. टीटीएमएल शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 290.15 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 10.45 रुपये आहे.

स्टॉक 290.15 रुपयांच्या उच्चांकावरून पुन्हा एकदा 93.40 रुपयांपर्यंत घसरला होता. यानंतर शेअर पुन्हा तेजीत आला. जर मागील 11 दिवसांमध्ये शेअर 152 रुपयांवर पोहोचला.

गेल्या 6 महिन्यांत या शेअरने 331.21 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत शेअर 116.75 रुपयांवर चढला आहे. सततच्या अप्पर सर्किटमुळे, या स्टॉकने गेल्या 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे.

कंपनीच्या या निर्णयामुळे शेअर्समध्ये मोठी घसरण 

Tata Teleservices Ltd च्या महसूल आणि व्याज संदर्भातील एका निर्णयानंतर शेअरमध्ये घसरण झाली. यानंतर कंपनीने आपला निर्णय रद्द केला. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये थोडी तेजी आली. 

पण डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 302 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाल्याची नोंद झाल्यानंतर या शेअरमध्ये लोअर सर्किट लागले आहे.