Dr Babasaheb Ambedkar: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या एका व्यक्तीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. हमारा प्रसाद (Hamara Prasad) असं या व्यक्तीचं नाव आहे. हमारा प्रसाद याने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडीओत त्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक विधानं केली होती. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तेलंगणात (Telangana) हा सगळा प्रकार घडला आहे.
व्हिडीओत हमारा प्रसाद याने हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं पुस्तक पकडलं होतं. "आज जर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर ज्याप्रमाणे गोडसेने गांधींना ठार केलं त्याप्रमाणे मी त्यांची हत्या केली असती," असं धक्कादायक विधान यावेळी त्याने केलं आहे. (I would have killed Ambedkar like how Godse shot Gandhi) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती.
ఒక వైపు ఓట్ల కోసం రోజూ అంబేద్కర్ జపం చేస్తున్న @BRSparty ఈ హమారాప్రసాద్ లాంటి మూర్ఖులు ‘బాబాసాహెబ్ బతికుంటే కాల్చి చంపేవాడిని’ అని కోట్లాది మంది మనోభావాలు దెబ్బతీసినా మీరు ఎందుకు వీడిని IPC153A,PD Act కింద జైలులో పెట్టడం లేదు?రాష్ట్రం అగ్నిగుండం అయ్యే దాకా ఆగుతరా? pic.twitter.com/DfRZpEHi7O
— Dr.RS Praveen Kumar (@RSPraveenSwaero) February 9, 2023
"हैदराबाद शहरातील सायबर क्राइम पोलीस स्थानकाने हमारा प्रसाद याला अटक केली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानजक विधान करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Today Cyber crime police station, Hyderabad City arrested Hamara prasad Registered FIR 256/2023 U/S 153A,505(2) IPC on abusing Dr. BR Ambedkar & forwarding videos through social media platforms. pic.twitter.com/sYCDPHrTjz
— Hyderabad City Police (@hydcitypolice) February 10, 2023
या व्हिडीओनंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. बहुजन समाज पक्षाचे तेलंगणामधील प्रमुख आरएस प्रवीण कुमार यांनी आरोपीविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. प्रवीण कुमार यांनी बीआरएस पक्षावर निशाणा साधला असून फक्त मतांसाठी आंबेडकरांच्या नावाचा जप केला जात असल्याची टीका केली आहे. हमारा प्रसादने करोडो लोकांच्या भावना दुखावल्या असल्याचं ते म्हणाले आहेत. हैदराबाद पोलिसांनी हमारा प्रसादला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरोधात कलम 153 A आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.