A Son Emotional Letter to Mother: नोकरी म्हटलं की मग त्यात असणारे टार्गेट, कामाचा बोजा यामुळे अनेकदा आपण त्रस्त असतो. त्यातही जर महिला असेल तर त्यांच्यावर कामासह कुटुंबाचं ओझंही असतं. नोकरी आणि कुटुंब अशा दोन्ही आघाड्यांवर कष्ट करताना त्यांची होणारी दमछाक अनेकदा दुर्लक्षित होत असते. पण या अशा तणावातही दिवसाच्या शेवटी आपलं मूल प्रत्येक आई-वडिलांचा हा मानसिक भार कमी करण्यात मदत करत असतं. हेच निरागस मूल जेव्हा एका आपल्या भावना समजू लागतं तेव्हा होणारा आनंदही वेगळाच असतो. असंच एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सहा वर्षाच्या मुलाने लिहिलेलं हे पत्र (6 year old emotional letter to mother) वाचल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
ट्विटर युजर @acweyand यांनी आपल्या अकाऊंटवर एक ट्वीट केलं आहे जे प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पोस्ट केलेलं पत्र (woman share child’s note) वाचून लोक भावूक होत आहेत. महिलेच्या अकाऊंटवरुन त्या एक डॉक्टर असून कॅन्सरवर उपचार करतात अशी माहिती मिळते. यासह त्या एका सहा वर्षाच्या मुलाच्या आई आहेत.
महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलाने लिहिलेलं पत्र पोस्ट केलं आहे. या पत्रात लिहिण्यात आलं आहे की, "आई जर तुझा आजचा दिवस वाईट गेला असेल तर मला माफ कर". इंग्रजीत लिहिलेल्या पत्रातील हस्ताक्षर पाहून ते लहान मुलानेच लिहिल्याचं दिसत आहे. महिलेने हा फोटो शेअर करताना 'माझ्या सहा वर्षाच्या मुलाने माझ्यासाठी हे लिहिलं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी हे मी माझ्यासजवळ ठेवणार आहे'.
या पोस्टला हजारो लोकांनी लाईक केलं आहे. अनेकांनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजरने सांगितलं आहे की, जेव्हा मला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं, तेव्हा माझ्या 9 वर्षाच्या मुलाने पेटिंग भेट म्हणून दिली होती. आता ती 24 वर्षांची आहे आणि ते पेटिंग त्यांच्याकडे आहे. एका युजरने आपल्या मुलाने लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे, ज्यामध्ये तिच्या मुलाने तू सर्वोत्तम आई असल्याचं म्हटलं आहे. आपण 12 वर्षांपासून हे पत्र आपल्याकडे ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.