नवी दिली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान दहशतवादी कारवाया होण्याचे प्रकार वाढतात. या काळजी म्हणून भारतीय सैन्य यंत्रणेसह सज्ज झाले आहे. भारतीय दलाच्या सजगतेमुळे प्रजासत्ताक दिनी घातपाताची शक्यता टळली आहे. देशाच्या राजधानीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्याच्या आरोपात जैश-ए-मोहम्मद च्या कथित सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली. जम्मू काश्मीरच्या वाकुरा आणि बाटापोरा येथे राहणाऱ्या अब्दुल लतीफ गनी (29) उर्फ उमर उर्फ दिलावर आणि हीलाल अहमद भट यांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लक्ष्मी नगरच्या एका दुकानात काही संशयित ये-जा करत असल्याची माहिती सैन्याच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. याआधारे 20 आणि 21 जानेवारी दरम्यान रात्री दिलावरला अटक करण्यात आल्याचे विशेष पोलीस उपायुक्त पीएस कुशवाह यांनी सांगितले. दिलावर कोणाला तरी भेटण्यासाठी राजघाट जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे सशस्त्र दल सज्ज झाले आणि त्याला अटक करण्यात आली.
दिलावर याच्याकडूवन.32 बोरची पिस्टल आणि 26 कार्तूसे आणि इतर वस्तू देखील मिळाल्या आहेत. दिलावरची ओळख पटण्यासाठी दिल्ली पोलिसांना काही महिन्यांचा वेळ गेला.
दहशतवादी हल्ल्यासाठी दिल्लीतील अनेक जागांवर पाहणी करणाऱ्या भट याला बांदीपोरा येथून अटक करण्यात आली. त्याच्या चौकशी दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या. भट हा जैशचा सदस्य आहे आणि दिलावर हा दहशतवादी संघटनेचा गांदेरबल जिल्ह्यातील कमांडर आहे.