भारतीय सैन्याच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीर आणि सीमा भागात दहशतवाद्यांचे हल्ले सुरुच असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री भारतीय सैन्याच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांनी हल्ला अचानक हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated: May 31, 2018, 10:55 AM IST
भारतीय सैन्याच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला title=
File Photo

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीर आणि सीमा भागात दहशतवाद्यांचे हल्ले सुरुच असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री भारतीय सैन्याच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांनी हल्ला अचानक हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे पेट्रोलिंगसाठी निघालेल्या भारतीय सैन्याच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानेही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सर्च ऑपरेशन दरम्यान मारल्या गेलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह जम्मू काश्मीरमधील काजियाबाद जंगलात आढळले. भारतीय सैन्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसरात हा हल्ला केला होता. 

दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, अद्यापही काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने भारतीय सैन्यातर्फे परिसरात शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री भारतीय सैन्य दलाची एक तुकडी कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे गस्त घालत असताना जंगलातून अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर सैन्यानेही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. सैन्य दल आणि दहशतवादी यांच्यात बराच वेळ चकमक सुरु होती. दहशतवाद्यांकडून होणारा गोळीबार थांबल्यानंतर सैन्य दलाने जंगलात सर्च ऑपरेशन करण्यास सुरुवात केली.