Jammu Kashmir : CRPF जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला

वाचा सविस्तर वृत्त 

Updated: Jul 1, 2020, 09:23 AM IST
Jammu Kashmir  : CRPF जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील सोपोर येथे गस्त घालणाऱ्या CRPF जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफच्या सूत्रांचा हवाला देत एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

 

दहशतवाद्यांकडून जवानांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या या हल्लयामध्ये सध्या हाती आलेल्या माहितीनुसार ४ सीआरपीएफ जवान आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचं कळत आहे. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी दोन जवानांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं होतं. ज्यानंतर आता या हल्ल्यात एका जवानाचा आणि स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.  

जम्मू काश्मीर पोलीसमधील अधिकारी दिलबाग सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच तातडीनं सुरक्षा दलांनी येथे शोधमोहिम सुरु केली आहे. दरम्यान सध्याच्या घडीला या परिसरामध्ये सुरक्षा दलांनी ताबा घेतला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.