गोरखपूरला निघालेली ट्रेन ओडिशाला कशी पोहोचली? रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण

गुरूवारी वसई रोड स्थानकावरून गोरखपूरला जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती. 

Updated: May 23, 2020, 05:48 PM IST
गोरखपूरला निघालेली ट्रेन ओडिशाला कशी पोहोचली? रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण title=

मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा वाढाता फैलाव पाहता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. परिणामी हातावर पोट असलेल्या कामरागांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र समोर येत आहे. हाती काम नाही आणि उपासमारीमुळे कामगारांनी पायी आपल्या गावची वाट धरली होती. या कामगारांसाठी रेल्वे मंत्रालयानं त्यांना आपल्या राज्यात पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुरूवात केली आहे. 

गुरूवारी वसई रोड स्थानकावरून गोरखपूरला जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ही रेल्वे गोरखपूरला पोहोण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर ओडिशामध्ये पोहोचली. जेव्हा ही घटना प्रवाशांना लक्षात आली  तेव्हा सर्व प्रवाशांची तारांबळ उडाली. काही प्रवाशांनी याबाबत विचारणाही केली. प्रवाशांच्या या प्रश्नांवर रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

रेल्वे आपला मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर गेली नसल्याचं रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सांगितलं आहे. २१ मे रोजी ही श्रमिक रेल्वे गोरखपूरच्या दिशेने निघाली होती. ही ट्रेन कल्याण-भुसावळ-इटारसी-जबलपूर-माणिकपूर या मार्गांवरूनच धावणार होती. परंतु  विद्यमान मार्गावर कंजेशन असल्यामुळे या ट्रेनचा मार्ग बिलासपूर, रसुगुडा, राउरकेला, आसनसोल या दिशेने वळवण्यात आल्याचं स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलं आहे.