कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मानवतेला लाज आणणारी घटना समोर आली आहे. फक्त 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे. सातवीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच वर्गमित्राने ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला होता.
नदियाच्या धनताला पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपी बांग्लादेशात पळाला आहे. आरोपीचे नातेवाईक बांग्लादेशात राहतात.
पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. सातवीत शिकणाऱ्या तिच्या मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलावर शारिरीक शोषणाचा मोबाईलमध्ये तिचे अश्लिल फोटो सेव करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप लावला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पीडितेची आई प्रचंड घाबरली होती. ती न्यायासाठी अक्रोश करतेय. कुटूंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेबाबत तक्रार केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तापासांनुसार अल्पवयीन आरोपीला फरार घोषीत करण्यात आले आहे. घटनेचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.